Home | Khabrein Jara Hat Ke | Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth

ड्रोनने काढले आहेत हे सिक्रेट Photos, येथे छायाचित्र घेण्यास आहे बंदी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:28 AM IST

फोटोग्राफी एक आर्ट आहे. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन त्याला आणखी झळाळी आणता येते.

 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth

  फोटोग्राफी एक आर्ट आहे. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करुन त्याला आणखी झळाळी आणता येते. आधी ब्लॅक अॅण्ड व्हाईट कॅमेऱ्याने फोटो काढले जायचे. आता मोबाईल कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. पण जगात काही अशाही जागा आहेत जेथे फोटो काढण्याची बंदी आहे. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून लपून हे फोटो काढण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला या सिक्रेट जागांचे फोटो दाखवणार आहोत.

  येथे फोटो घेण्याची आहे बंदी
  मनुष्य जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ड्रोनच्या मदतीने फोटो घेतले जातात. यातील काही फोटोंमध्ये निसर्गाचे आश्चर्य लपले आहे तर काहींमध्ये धोकादायक गोष्टी आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत जेथे फोटो काढणे अगदी जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे. आता जरा हा फोटोच बघा. हा फोटो सिरीयाच्या एका दुर्मिळ भागातील आहे. येथे टॅंक युद्ध सुरु आहे. हा फोटो काढणे कोणत्याही फोटोग्राफरला शक्य झाले नसते.

  पुढील स्लाईडवर बघा, असेच काही आश्चर्यकारक फोटो....

 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth
  युक्रेनच्या प्रिप्यतमध्ये १९८६ मध्ये न्यु्क्लिअर दुर्घटनेनंतर लोकांनी परिसरात राहणे सोडले. ड्रोनच्या माध्यमातून काढलेल्या या फोटोत मिसाईल अटॅक झाला तर पूर्वसुचना मिळण्यासाठी लागलेली यंत्रणा लावलेली दिसत आहे.
 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth
  नॉर्वेच्या स्पिट्सबेर्गेमध्ये नॉर्थ पोलपासून ६५० मैल दूर असा वॉल्ट तयार केला आहे, जेथे जगातील सुमारे ८ लाख बियाणे जपून ठेवले आहेत. त्यामुळे एखाद्या वनस्पतीची प्रजाती नष्ट झाली तर ती पुन्हा निर्मित करता येईल.
 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth
  कजन्तिपमध्ये तयार करण्यात आलेल्या ऑटोमिक एनर्जी स्टेशनची निर्मिती १९७६ मध्ये काही कारणांमुळे रोकण्यात आली. त्यानंतर या परिसरात जाण्यास लोकांवर बंदी घालण्यात आली.
 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth
  अमेरिकेत राहणाऱ्या ट्रे रेटक्लिफने चीनच्या बिजिंगचे फोटो ड्रोनच्या मदतीने घेतले होते. ही जागा फॉरबिडन सिटीच्या नावाने ओळखली जाते. काही फोटो घेतल्यानंतर चीनी सैनिकांनी त्यांचे ड्रोन जप्त केले. त्यांना अटक केली.
 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth
  २०११ मध्ये जापानच्या फुकुशिमामधील ओकुमात आलेल्या भुकंपानंतर न्युक्लिअर प्लॉट बंद करण्यात आला. तेव्हापासून हा परिसर असा विराण दिसतो.
 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth
  नेवाडाच्या एरिया ५१ ला अमेरिकेच्या अत्यंत गोपनिय परिसरांपैकी एक समजला जातो. असे सांगितले जाते, की या परिसराचा एलियन्सशी संंबंध आहे. सर्वसामान्य लोकांना येथे जाण्याची बंदी आहे. २०१५ मध्ये हॅन्स फॉल्व्नेर याने हा फोटो घेतला होता.
 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth
  युक्रेनच्या डेबल्टसेवोमध्ये २०१४ मध्ये झालेल्या मिलिटरी हल्ल्यात येथे मोठा विध्वंस झाला होता. त्याचे ड्रोनच्या माध्यमातून फोटो घेण्यात आले होते.
 • Secret Photos Taken By Drones Of Dangerous Places On Earth
  नॉर्थ कॅरोलिनामधील परिसरातील सर्वांत मोठ्या फॅक्टरीचा हा फोटो आहे. येथे जनावरांची हत्या केल्यानंतर त्यांचे भाग असे खुल्यावर फेकले जात होते.

Trending