Home | Business | Gadget | secret settings in your smartphone do you know

तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतात या Secret Settings, कदाचित तुम्हाला माहिती नसतील

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 27, 2018, 12:30 AM IST

फोन अधिकाधिक सुरक्षित ठेवता येईल यासह स्मार्टफोनचे काही बारकावे आम्ही सांगत आहोत.

 • secret settings in your smartphone do you know

  गॅजेट डेस्क - स्मार्टफोन आपल्या सवयीचा भाग बनला आहे. मित्र मैत्रिणींच्या गप्पा गोष्टी असो वा ऑनलाईन व्यवहारांचे पुरावे सर्वच गोष्टी यात रोज स्टोर केल्या जातात. बऱ्याच लोकांना कदाचित ही गोष्ट माहिती नसेल की हाच स्मार्टफोन आपल्या माहितीत असलेल्या गोष्टींसह माहितीत नसलेल्या गोष्टी सुद्धा नकळत स्टोर करत असतो. आपण मोबाईल की-बोर्डवर जे काही टाइप करता अगदी ते सुद्धा या फोनमध्ये साठवले जाते. ते कसे मिटवता येईल आणि फोन अधिकाधिक सुरक्षित ठेवता येईल यासह स्मार्टफोनचे काही बारकावे आम्ही सांगत आहोत. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये (या ठिकाणी Android) सुरक्षेसाठी सर्वांनी करून घ्याव्या अशा 4 सीक्रेट सेटिंग्स आहेत. आपल्या मोबाईलचा डेटा, पासवर्ड आणि इतर गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या छोट्याशा सेटिंग्स आवश्यक आहेत. प्रत्येकालाच याबद्दल माहिती असेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्या नेमक्या कोणत्या आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा आणि फॉलो करा या स्टेप्स...

 • secret settings in your smartphone do you know

  बाय डिफॉल्ट सेटिंग्सवर अॅन्ड्रॉएड फोन वापरणाऱ्यांना टायपिंगसाठी गुगल कीबोर्ड दिला जातो. या google keyboard बोर्डवर आपण टाईप करत असलेला प्रत्येक शब्द आपल्याला न कळत गुगलकडे सेव्ह केल्या जात असतो. ते अगदी संभाषण असो वा इंटरनेटवर सर्च केलेली एखादी गोष्ट असो... तुम्ही टाईप केलेल्या प्रत्येक शब्दाकडे गुगलची नजर आहे. अशा आपल्याला हा कीबोर्ड नको असल्यास खालील सेटिंग करा...
  Settings>Language&input>googlekeybord>Advanced मध्ये जावे.
  येथे Share usage Statistics आणि Share Snippets चे ऑप्शन येईल त्याला OFF करावे.

 • secret settings in your smartphone do you know

  आपण कुठल्याही अॅप किंवा वेबसाइटवर टाकत असलेला पासवर्ड आपो-आप गुगलवर सेव्ह होत असतो. आपल्याला हे नको असल्यास खालीलप्रमाणे सेटिंग करू शकता...
  Google Settings मध्ये जाऊन Smart Lock For Password मध्ये जावे. Add App Not to be save मध्ये जाऊन आपल्याला हवे असलेले अॅप किंवा वेबसाइट त्यामध्ये अॅड करावे. जेणेकरून त्या अॅप आणि वेबसाइटवर टाकल्या जाणारे पासवर्ड गुगलकडे सेव्ह होणार नाही. 

 • secret settings in your smartphone do you know

  Google मध्ये सर्च केल्या जाणारी प्रत्येक गोष्ट सुद्धा हिस्ट्रीमध्ये सेव्ह केल्या जात असते. ती डिलीट करण्यासाठी या सेटिंगचा वापर करावा.
  गूगल मध्ये Google My Activity सर्च करा... ओपन झालेल्या पेजवरील तीन ओळींवर टॅप करा, आता Delete Activity वर टच करा. येथे आपण हिस्ट्री डिलीट करू शकता. 

 • secret settings in your smartphone do you know

  क्रोम ब्राउजरच्या हिडन settings
  यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करून Chrome://Flags असे टाईप करून सर्च करावे लागेल. तेव्हा नवीन पेज ओपन होईल. यावर आपल्याला गुगल क्रोमच्या अशा काही हिडन सेटिंग्स सापडतील, ज्या कधीच पाहिल्या नसतील. यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार, त्या सेटिंग्समध्ये बदल करता येतील.

Trending