आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसच्या घरातील 9 सीक्रेट्स, अजून कुणालाही नाही याची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. सध्या 'बिग बॉस' चे 12 वे सीजन टीव्हीवर सुरु आहे. तुम्ही हा शो कदाचित पाहत नसाल, पण कॉलेज, ऑफिस किंवा सोशल मीडियावर याची चर्चा नेहमीत असते. यामुळे तुम्हाला याविषयी बरीच माहिती असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या कुणालाही माहिती नसतील. रोज बिग बॉस पाहणा-यांनाही बिग बॉसच्या घरातील हे सीक्रेट्स माहिती नसतील. 


1. घरात एन्ट्री पुर्वीची टेस्ट 
बिग बॉसच्या घरात दाखल होण्यापुर्वी स्पर्धकाला काही दिवस एकांतात घालवावे लागतात. येथे त्यांचा व्यवहार तपासला जातो. ते प्रेक्षकांना एन्टटेन करण्यात सक्षम आहेत की, नाही हे सुध्दा तपासले जाते.

 

2. हेयर ड्रायर 
बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी नेता येत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, बिग बॉसच्या घरात हेअर ड्रायर घेऊन जाता येत नाही, कारण त्यामुळे खुप आवाज होतो.


3. पुस्तक आणि देवाच्या मुर्ती 
जर स्पर्धक घरात बसून पुस्तक वाचत बसला, तर तो प्रेक्षकांचे मनोरंजन कधी करणार. यामुळे त्यांना पुस्तक नेता येत नाही. देवाच्या मुर्तीही घरात नेता येत नाहीत.


4. सिगारेटचा सप्लाय 
स्पर्धकांना प्रत्येक दोन-तीन दिवसांना सिगारेट पोहोचवल्या जातात. भारतीय टीव्हीवर सीगारेट पिताना दाखवता येत नाही यामुळे बंद खोलीमध्ये जाऊन त्यांना सिगारेट प्यावी लागते. त्यांना या ठिकाणी एकटे जावे लागते कारण दोन स्पर्धकांना येथे गप्पा मारता येऊ नये. 

 

5. किडे असतात 
घरामध्ये खुप किडे असतात. येथे ठरलेल्या वेळी औषध फवारणी होते. 


6. घरात एकही घड्याळ नाही 
स्पर्धकांना वेळेचा अंदाज बांधणे अवघड होते. घरात एकही घड्याळ नसते. घरात ज्या घड्याळ दिसतात त्या काहीच कामाच्या नसतात. बाहेरुन येणा-या आवाजावरुन ते वेळेचा अंदाज लावतात. 


7. क्रू मेंबर्सचा आवाज 
बिग बॉस स्पर्धकांनुसार, त्यांना तिथल्या क्रू मेंबर्सचा आवाज प्रत्येक वेळी ऐकू येत असतो. ]


8. साधे जेवण
घरातील लोकांना जेवण तयार करण्यासाठी साहित्य उपलब्ध केले जाते. यामध्ये मीट, चिकन आणि इतर मसाल्यांचा समावेश नसतो. यासाठी त्यांना Luxury Budget Task पुर्ण करावे लागते. 


9. घरात भूत आहे (असे काही स्पर्धक मानतात)
असेही ऐकण्यात आले आहे की, बिग बॉसच्या घरात भूत आहे. काही क्रू मेंबर्सने सांगितले की, त्यांनी घरात एका महिलेला फिरताना पाहिले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...