आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - अयोध्या विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आले. अयोध्येचे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात ड्रोनद्वारे फिल्म रेकॉर्डिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणातील कोर्टाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मुदत वाढीचा आढावा घेतला होता आणि त्यासाठी 17 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 2014 च्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालय सुनावणी पार पडत आहे.
दसर्याच्या आठवडाभराच्या सुट्टीनंतर सुप्रीम कोर्टात अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणाची सुनावणी सोमवारी अंतिम टप्प्यात दाखल होईल आणि कोर्टाचे घटना पीठ 38 व्या दिवशी या खटल्याची सुनावणी करेल. दरम्यान हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यास मध्यस्थी समितीला अपयश आल्यामुळे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाबाबत 6 ऑगस्टपासून दैनंदिन सुनावणी सुरू केली. दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 2014 च्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालय 14 अपीलांवर सुनावणी करीत आहे.
16 नोव्हेंबरपर्यंत अयोध्या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित
खंडपीठाच्या सदस्यांमध्ये न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्या. डी.वाय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस ए नजीर यांचा समावेश आहे. अंतिम युक्तिवादाचे वेळापत्रक ठरवताना कोर्टाने सांगितले की, 14 ऑक्टोबरपर्यंत मुस्लिम पक्ष आपला युक्तिवाद पूर्ण करतील. यानंतर हिंदू पक्षांना आपला प्रतिवाद पूर्ण करण्यासाठी 16 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. दरम्यान 16 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगाई सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे 16 नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणातील निर्णय देणे नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.