आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सेक्युलर म्हणजे 'नो हिंदू राष्ट्र', कळलं का..?', एमआयएम प्रमुख असद्दुदीन ओवैसींचा उद्धव ठाकरेंना सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्रकार परिषदेत सेक्यूलर शब्दावरुन उद्धव ठाकरे भडकले

नवी दिल्ली- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. काल त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांना एक प्रश्न विचारल्यामुळे ते नाराज दिसले. सेक्युलॅरीझमवर विचारलेल्या एका प्रश्नामुळे चिडले. त्यावर आता एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे. ओवैसी यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना म्हणाले की, 'खूप विचार करावा लागणारा हा प्रश्न नाहीये. स्वतःच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममधील शब्दांचा अर्थ विचारण्याची काही गरज नाहीये. तरीदेखील काही ज्ञान देतो...सेक्युलरचा अर्थ असतो की, हिंदू राष्ट्र नाही आणि दोन वेगवेगळ्या विचारधारा मानणारे नाही." ओवैसींनी आपल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंच्या कार्यलायलाही टॅग केले. 

शपथविधीनंतर सह्याद्रीमध्ये ठाकरे सरकारची कॅबिनेट मीटिंगपार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, "मी राज्यातील जनतेला विश्वास देतो की, आम्ही एक चांगले सरकार देऊ." या दरम्यान त्यांना महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामधील 'सेक्यूलर' शब्दाचा वापर करण्यावरुन एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, शिवसेना सेक्युलर झाली आहे का? त्यावर ठाकरे थोडे नाराज झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्या पत्रकारालाच सेक्यूलर शब्दाचा अर्थ विचारला आणि नंतर म्हणाले की, संविधानात जे काही आहे, ते सर्व सेक्यूलर आहे.

बातम्या आणखी आहेत...