आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे घर तुमच्यासाठीच ठरू शकते अडचण; जर नाही खरेदी केले हे कव्हर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आजकाल सर्वजण कार आणि बाइकचा इन्शुरन्स काढतात. परंतू घराचा इन्शुरन्स काढण्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. तुमची सर्वात मोठी गंतवणूक तुमचे घर आहे. त्यामुळे घराच्या सुरक्षेसाठी काही प्लॅन करणे महत्वाचे असते. तुम्ही होम लोन काढून घर खरेदी करत असाल तर तुम्हाला शॉर्ट सर्किट किंवा काही आपत्तीजनक घटनांपासून घराची सुरक्षा करण्यासाठी प्लॅनिंग करणे महत्वाचे असते. त्यासाठी मुख्य उपाय म्हणजे घराचा इन्शुरन्स काढणे. 

 

या घटनांवर मिळतो विमा कव्हरेज
होम इन्शुरन्स पॉलिसीमध्ये घराला आग लागणे, घरावर विज पडणे, दंगली, वादळ, त्सुनामी, पूर, भुकंप, मिसाइल टेस्टिंग, चोरी, दहशतवाद्यांचा हल्ला या सारख्या घटनांमध्ये विमा कव्हरेज मिळते.

 

घरासोबतच सामानाचाही असतो विमा
तुम्ही घराचा इन्शुरन्स काढताना घरातील सामानाचादेखील विमा काढू शकता. घरातील सामानाचा विमा हा मार्केट व्हॅल्युप्रमाणे असतो. तसेच घराची व्हॅल्यु कंस्ट्रक्शन कॉस्टवर आधारलेली असते.

 

कसा मिळेल क्लेम
तुमच्या घरात एखादी दुर्घटना घडली तर तुम्ही होम इन्शुरन्स पॉलिसी क्लेम करु शकतात. त्यासाठी तुम्हाला पोलिसांकडून मिळालेली एफआयआरची कॉपी, दुर्घटनेचा फायनल रिपोर्ट त्यासोबतच सगळे बिले आणि रिपेअर इस्टिमेटची कॉपी जमा करावी लागते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...