आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगरमधील मार्केटमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेडने हल्ला, 1 ठार 20 जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- येथील मौलाना आजाद रोडवर आज(सोमवार) दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेडने हल्ला केला. रहदारी असलेल्या या परिसरात केलेल्या हल्यात 1 जण ठार झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या रुग्णालयात दाखल केले आहे.पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला, पण तो रस्त्याच्या बाजुला जाऊन पडला. या विस्फाटोत एकाला आपला जीव गमवावा लागला तर 20 जण जखमी झाले आहेत. सध्या पोलिस आणि लष्कराने तपास सुरू केला आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो श्रीनगरमध्ली हरी सिंह स्ट्रीट गर्दी असलेला परिसर आहे.

मागील महिन्यात लष्कराने जैशचे दहशतवादी मारले
 

मागील महिन्यात जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा परिसरात सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 3 दहशतवादी मारले होते. लष्कराला हे दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर जवान तेथे गेले असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यांना उत्तर देताना भारतीय जवानांनी फायरिंग केली आणि 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

बातम्या आणखी आहेत...