आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला दसऱ्याच्या दिवशी मिळणार पहिले राफेल विमान; फ्रान्समध्ये राजनाथ सिंह स्वतःच्या हस्ते करणार शस्त्र पुजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावर्षी दसऱ्याच्या दिवशी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शस्त्र पुजन करणार आहेत. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री पहिले राफेल भारताकडे सुपूर्त करणार आहेत. दरम्यान राजनाथ सिंह या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुअल मॅक्रोंची भेट घेण्याची शक्यता आहे. 

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, ''संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शस्त्र पुजन करतात. यावेळी ते फ्रान्सच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि ते तेथे देखील ही परंपरा कायम ठेवणार आहेत.'' पहिल्या राफेल विमानाच्या चाचणीला 'आरबी-01' नाव देण्यात आले आहे. राफेल करारात महत्वाची भूमिका निभावणारे भारतीय हवाईदल प्रमुख एअर मार्शल आरबीएस भदौरिया यांच्या सन्मानार्थ पहिल्या राफेल विमानाच्या चाचणीला हे नाव देण्यात आले आहे. 
 

2016 मध्ये झाला होता करार
भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये राफेल युद्ध विमानाचा करार झाला होता. या करारांतर्गत भारतीय हवाई दलाला 36 अत्याधुनिक लढाऊ विमाने मिळणार आहेत. हा करार 7.8 कोटी यूरोचा (अंदाजे 58 हजार कोटी रुपये) आहे. काँग्रेसचा दावा आहे की, यूपीए सरकारच्या काळात एका राफेल लढाऊ फायटर जेटची किंमत 600 कोटी रुपये निश्चित केली होती. मोदी सरकारच्या काळात एक राफेल 1600 कोटी रुपयांना मिळणार आहे. 
 
भारत आपल्या पूर्व आणि पश्चिम भागात हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी राफेल घेत आहे. हवाई दल राफेलचे एक-एक स्क्वॉड्रॉन हरियाणाच्या अंबाला आणि पश्चिम बंगालच्या हशीमारा हवाई तळावर तैनात करणार आहे.