आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sedition Charges Against Honeypreet And Other Accused Dropped In Panchkula Violence Case News, Updates

राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतसह 15 आरोपींविरोधात राष्ट्रद्रोहाचे कलम हटवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम रहीमच्या अटकेनंतर पंचकुलामध्ये भडकला होता हिंसाचार
  • ऑगस्ट 2017 च्या हिंसाचारात गेला होता 36 जणांचा जीव
  • हनीप्रीतवर लागले होते हिंसाचार भडकावण्यासह राष्ट्रद्रोहाचे आरोप

पंचकुला - डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतसह 15 जणांविरुद्ध देशद्रोहाचे कलम हटवण्यात आले आहे. साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट 2017 मध्ये अटक झाली होती. त्यावेळी पंचकुलामध्ये हिंसाचार भडकला होता. यामध्ये 36 जणांचा जीव गेला होता. यात डेरा समर्थकांनी कित्येक वाहनांवर आणि कार्यालयांसह पेट्रोल पंपांवर सुद्धा पेट्रोल बॉम्ब फेकले होते. हनीप्रीतसह 15 जणांनी या हिंसाचाराचा कट रचला होता असे आरोप लावण्यात आले होते. याच प्रकरणात हनीप्रीत आणि सहकाऱ्यांवर देशद्रोहाचे कलम लागले होते.

पंचकुलाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश संजय धीर यांच्या कोर्टात शनिवारी आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी हनीप्रीतने व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. पोलिस हनीप्रीतसह इतर आरोपींच्या विरोधात लावलेल्या देशद्रोहाचे आरोप सिद्ध करू शकले नाही. यानंतर पंचकुला कोर्टाने आरोपींच्या विरोधात लावलेल्या भारतीय दंड विधानाच्या कलम 216, 145, 150, 151, 152, 153 आणि 120 ब अंतर्गत आरोप निश्चित केले. तसेच देशद्रोहाचे हटवले.

हिंसाचारानंतर पोलिसांनी हनीप्रीतचा शोध सुरू केला. परंतु, या घटनेच्या 38 दिवसांपर्यंत ती कुणाच्याच हाती लागली नाही. पोलिसांनी दावा केला की हनीप्रीतला पंजाबातून पकडण्यात आले. यानंतर तिला अंबाला येथील तुरुंगात कैद केले. याच ठिकाणी राहून तिने व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. हनीप्रीतने कोर्टात जामीन अर्ज देखील केला होता. परंतु, तो फेटाळून लावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...