आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • See Who Is That Person Due To Him Changed The Life Of Ranu Mandal Singing At The Station In Overnight

पाहा कोण आहे ती व्यक्ती, ज्याच्यामुळे स्टेशनवर गाणाऱ्या राणू मंडलचे आयुष्य एका रात्रीत बदलले, एका व्हिडओची आहे कमाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्याशी मिळती-जुळती आवाज असणारी रानू मंडलचा व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात ती लता मंगेशकरचे प्रसिद्ध गाणे ‘प्यार का नगमा’ गाताना दिसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राणूचे भाग्य चमकले अखेर तिला बॉलीवूडमध्ये पहिली संधी मिळाली. राणूला हा ब्रेक प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने दिला आहे. पण हिमेश रेशमियाच्या आधी एक व्यक्ती अशी आहे जी रानूसाठी देवासारखी आली. एका व्यक्तीने राणूचा व्हिडीओ बनवला जो व्हायरल झाला. 
 
राणू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणे गाऊन पोट भरायची. ती जुनी गाणी म्हणायची. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही तिने लता मंगेशकर यांचे 'एक प्यार का नगमा' हे गाणे गायले आहे. ज्यावेळी राणू हे गाणे म्हणत होती तेव्हा एतींद्र चक्रवर्ती नावाची एक व्यक्ती स्टेशनवर होता आणि त्याने हा व्हिडीओ बनवला. एतींद्रने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला. त्यानंतर राणू एका दिवसातच खूप प्रसिद्ध झाली. नंतर तिला जेव्हा हिमेश रेशमियासाठी गाणे रेकॉर्ड  तेव्हा ती तिथे गेली आणि त्यावेळी एतींद्रदेखील स्टूडियोमधेच होता. एतींद्रला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता कि, त्याच्या एका व्हिडीओने एका महिलेचे आयुष्य असे बदलले. राणूला संधी देण्यासाठी एतींद्रने हिमेश रेशमियाचे आभार मानले. व्हिडिओनंतर एतींद्र राणूच्या संपर्कात आहे. एतींद्र एक सॉफ्टवेअर इंजीनियर आहे आणि रानाघाटमधेच राहतो. 

बातम्या आणखी आहेत...