आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Seeing The Less Rush To The Campaign, Amit Shah Said, Go Home And Call The People!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रचारसभेला कमी गर्दी पाहून अमित शहा म्हणाले, घरी जाऊन लाेकांना फाेन लावा!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चतरा : भाजप अध्यक्ष अमित शहा गुरुवारी झारखंडच्या चतरा व गढवामध्ये हाेते. येथे आयाेजित निवडणूक प्रचार सभेतील कमी गर्दी पाहून शहा यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एवढीच गर्दी हाेत असेल तर निवडणूक कशी जिंकणार? मला तुम्ही मूर्ख बनवू नका. मीही बनिया आहे. गणित मलाही येते. घरी जा आणि प्रत्येकाने २५ लाेकांना फाेन करून त्यांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करा, अशी सूचना शहांनी दिली.

ते म्हणाले, ज्यांच्याकडे माेबाइल आहेत. त्यांनी हात उंचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. शहा यांनी विराेधी पक्षावर निशाणा साधताना झारखंडमध्ये काँग्रेस व झामुमाे यांच्यासाेबत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले हाेते. झारखंडच्या स्थापनेसाठी काँग्रेसने काय केले आहे, असे कधी झामुमाेने विचारले आहे का? या सभेत शहा यांनी देशातील घुसखाेरीच्या मुद्यावर सांगितले की आता माैनीबाबाचा काळ नाही. माेदींचे सरकार आहे. पूर्वी माैनीबाबाच्या कार्यकाळात आलिया, मालिया, जमालिया भारतात दरराेज घुसखाेरी करत हाेते. आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० ला हटवले आणि आमचे मनसुबे देखील स्पष्ट केले. काँग्रेसने अडचणी आणल्या. परंतु सर्वाेच्च न्यायालयाने अयाेध्येत मंदिर बांधण्याचे आदेश दिले. आम्ही अयाेध्येत जगातील सर्वात भव्य मंदिर उभे करणार आहाेत, असे शहा यांनी सांगितले. निवडणुकीसाठी शहा यांचा हा आठ दिवसांतील दुसरा झारखंड दाैरा आहे.
 

बातम्या आणखी आहेत...