आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा फॅमिलीला दरवाजा बंद करून पाहावा लागला होता अॅक्ट्रेसचा रेप सीन, फिल्म संपताच आपला चेहरा लपवत होत्या पण पित्याची रिअॅक्शन पाहून झाल्या होत्या हैराण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : फिल्म 'बैंडिट क्वीन' मध्ये फूलन देवीची भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री सीमा बिस्वास 54 वर्षांच्या झाल्या आहेत. 14 जानेवारी, 1965 ला असमच्या नलबारीमध्ये जन्मलेल्या सीमा यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अॅक्टिंग कोर्स केला आहे. सीमा यांनी 1988 आलेली फिल्म 'अमसिनी' ने डेब्यू केला होता. मात्र, त्यांना खरी ओळख 1994 मध्ये शेखर कपूरची फिल्म 'बैंडिट क्वीन' ने मिळाली. ही फिल्म तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा मीडियामध्ये त्यातील रेप सीनच्या खूप बातम्या पसरल्या होत्या.  

 

दरवाजा बंद करुन पाहिला होता बिस्वास फॅमिलीने चित्रपट..
- रिलीजच्या दोन वर्षांपूर्वी बिस्वास फॅमिलीने या चित्रपटाची अनसेन्सॉर्ड कॉपी आसाम येथे त्यांच्या घरी पाहिली होती. 
- यावेळी सीमा यांच्या आई त्यांच्या मांडीवर झोपण्याचे नाटक करत होत्या. दरवाजे आणि पडदे लावले होते आणि संपूर्ण घरात शांतता होती. 
- सीमा यांनी घरातील लाईट बंद केले होते, जेणेकरुन कोणाला कळू नये की ते घरात 'बँडेट क्वीन' चित्रपट पाहत आहेत.
- सीमा यांनी लाईट यासाठी बंद केले होते, कारण त्यांची इच्छा नव्हती, की चित्रपट संपल्यावर त्यांच्या कुटुंबाने त्यांना पाहावे. 
- पण असे घडले नाही. चित्रपट पाहिल्यावर सीमाच्या वडिलांनी त्यांच्याकडे बघत म्हटले की, "हा रोल तर फक्त आपली सीमाच करु शकते." त्यानंतर सीमा यांनी सुटकेचा श्वास टाकला.

 

रोलमध्ये राहण्यासाठी दोन दिवस काहीच खाल्ले नव्हते...
- सीमा यांनी फूलन देवीची फक्त भूमिका केली नव्हती तर ती प्रत्यक्षात जगलीही होती. शूटिंगवेळी सीमा यांनी काही दिवस काहीच खाल्ले नव्हते. यादरम्यान त्या जंगलात राहिल्या होत्या.
- शूटिंगवेळी सीमा यांनी इतर जगाशी जसे काही नाते तोडले होते. त्या धौलपूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये तासन्तास बसून राहायच्या आणि भूमिकेचा विचार करायच्या.

 

न्यूड सीनमुळे रात्रभर रडायच्या सीमा...
- 'बँडेट क्वीन' चित्रपटात सीमा बिस्वास यांचा एक न्यूड सीनही होता, ज्याबद्दल फार चर्चा झाली होती. हा न्यूड सीन शूट केल्यानंतर सीमा रात्रभर रडल्या होत्या. 
- जेव्हा या सीनचे शूटिंग सुरु होते तेव्हा दिग्दर्शक आणि कॅमेरामॅनशिवाय सर्व लोकांची सेटवर एंट्री बॅन होती. सीमा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यावेळी या चित्रपटाबद्दल लोकांची प्रतिक्रिया फार खराब होती. विशेषतः चित्रपटातील न्यूड सीनबद्दल लोकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या.
 - अनेकजण या चित्रपटानंतर माझा राग करु लागले होते. मी त्यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही.
 - सीमा यांनी सांगितले की, बोल्ड सीन मी दिले नव्हते. त्यासाठी मी बॉडी डबलचा वापर केला होता. याविषयी माझ्या घरच्यांना माहीत होते त्यामुळे मला कोणत्याच स्पष्टीकरणाची काही गरज पडली नाही. रेपच्या सीननंतर चित्रपटाचे पूर्ण यूनिट रडू लागले होते. तो माझ्यासाठी सर्वात भावूक क्षण होता.

 

शेखर कपूर यांना केली होती न्यूड सीन डिलीट करण्याची मागणी..
 - सीमा यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी शेखर कपूर यांना चित्रपटातील न्यूड सीन हटवण्याची मागणी केली होती. पण शेखर यांनी सत्य घटनेवरील चित्रपट असल्याने तसे करण्यास नकार दिला होता. 
 - बँडेट क्वीन चित्रपटावर फार टीका झाली होती आणि स्वतः फूलन देवी यांनी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली होती. 
 - पण या चित्रपटाला नंतर कोर्टाची मंजूरी मिळाली आणि चित्रपट प्रदर्शित झाला होता. 
 -  सीमा यांनी सांगितले होते की, हॉलिवूडमध्ये आजही काही लोक त्या सीनसाठी मला सलाम करतात, मी तो केला नव्हता तरीसुद्धा. पण भारतात अशा सीन्सला वेगळ्याच दृष्टीने पाहिले जाते.

 

सीमा दिग्दर्शकांना सतत विचारायच्या शॉट चांगला झाला की नाही..
- सीमा जेव्हा शूटिंग करत होत्या तेव्हा त्या दिग्दर्शकांना वारंवार विचारत असे की तिने शॉट चांगला दिला की नाही. सीमा दिग्दर्शकाशी चित्रपटाच्या सर्वच गोष्टींबाबत चर्चा करत असे. 
- सीमा यांची कामातील निष्ठा बघता शेखर कपूर यांनी सांगितले की, "चित्रपटातील फूलन देवीच्या भूमिकेसाठी सीमा 100 टक्के खरी उतरली."
 

 

बातम्या आणखी आहेत...