आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅनिटरी नॅपकिन कचऱ्यात फेकताना...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कचऱ्याचे व्यवस्थापन अनेक शहरांमध्ये बऱ्यापैकी केलेले असते.  पण घरी येणाऱ्या घंटागाडीत किंवा आपल्या डस्टबिनमध्ये सॅनिटरी नॅपकिन टाकताना अनेकदा ते कागद किंवा कॅरीबॅगमध्ये गुंडाळून टाकले जातात. पण याची योग्य पद्धत काय असावी यावर विचार करून नेमका पर्यायही शोधता येऊ शकतो
 
नेहमी कचरा कुंडीवर सारखेच चित्र दिसते. कोंडाळ्यात कचरा भरून बाहेर पडत असतो,  कुत्रे, गाई, कचरावेचक  हा संपूर्ण  कचरा विस्कटत असतात. आणि  त्यात गाईच्या तोंडात सॅनिटरी नॅपकिन किंवा रस्त्यावर विखुरलेले अनेक वेळा मी पाहिले आहे. कचरावेचक हे प्रत्येक कचऱ्याचे वर्गीकरण करतात. अशा पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन उघड्यावर फेकणे  हे सगळ्यांसाठी किती घातक आहे हे जाणवले. 

पूर्वी मासिक पाळीच्या वेळी कापडाचा वापर करत आणि ते कापड स्वच्छ करून परत वापरलं जायचं. अशी स्थिती पाहता तेच योग्य होते का असाही प्रश्न मनात आला.  पण बदलत्या काळानुसार आता बाजारात विविध कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन्स आले आणि हे वापरणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे. पण काही जण सॅनिटरी नॅपकिन हे पेपरमध्ये, प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकतात, तर काही जण  विचार न करता ते कसेही फेकतात. कारण फेकण्यासाठी जवळ असे कधी पेपर किंवा प्लास्टिक कॅरीबॅग असेल असे नाही.  

कचरा हा आपणच सगळे करत असतो आणि कचऱ्यात काय आहे हे देखील माहीत असताना ते योग्य प्रकारे कचरा वेगळा केला पाहिजे ही आपली जबाबदारी अाहे. त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सॅनिटरी नॅपकिन आधी प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकली जात होती, पण प्लास्टिक बंद झाल्यामुळे मग पेपरमध्ये गुंडाळून  फेकतो. तर मला ही कल्पना सुचली  आणि साऱ्या महिला आणि मुलींना नेहमी, सोबत ठेवायला सोपे आणि निसर्गासाठी, कचरा वेचकांसाठी, आरोग्यासाठीची सुरक्षित उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. प्रवासात, मॉल, शाळा, कॉलेज या ठिकाणी वापरण्यास आणि फेकण्यास सुरक्षित असे  पेपरपासून सॅनिटरी नॅपकिन डिस्पोझेबल पाऊच बनवण्यास सुरू केले. त्यात २ प्रकारचे पाऊच  तयार केले. रिसर्च करताना असेही लक्षात आले की, काही महिला, मुली सॅनिटरी नॅपकिन  धुऊन मग फेकतात. पण आम्ही तयार केलेल्या पाऊचमधून पॅड लीक होऊ नये म्हणून त्यास डबल पक्का धागा आहे. त्यामुळे पाऊच बांधणे सोपे होते आणि कचरा वर्गीकरण करताना कचरावेचकांच्या लक्षात येण्यासाठी त्यावर लाल डॉट लावून Happy To Bleed असा मेसेज लिहिला आहे . तसेच तुम्ही या पाऊचमध्ये सहजरीत्या पॅकिंगचेसुद्धा सॅनिटरी नॅपकिन ठेवू शकता.आम्ही नियमित सॅनिटरी नॅपकिन डिस्पोझेबल पाऊच हे औरंगाबाद, पुणे, नाशिक, इंदूर  येथे पाठवत असतो. या विविध शहरांतून माझ्यासोबत ५० पेक्षा अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत.  आणि  दर महिन्याला ८०० ते १००० पाऊच महिलांपर्यंत पोहोचवले  जातात. 
खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला, हे बघून मनाला खूप समाधान वाटले. शेवटी एवढेच म्हणेल की….! ‘सॅनिटरी नॅपकिन डिस्पोझेबल पाऊच चा वापर करू, आपल्या आजूबाजूला सुंदर परिसर निर्माण करू.’
 

हॅपी टू ब्लीड....
सॅनिटरी नॅपकिन कचऱ्यात टाकताना ते ज्या कागदात गुंडाळून टाकत आहोत, त्यावर एक मोठा लाल डॉट लावून टाकले तरी कचरावेचकांसाठी आपला हा लहानसा प्रयत्न खूप उपयुक्त ठरू शकतो. यामुळे त्यात नॅपकिन आहे याची कल्पना त्यांना सहज येते. 

लेखिकेचा संपर्क : ९८२३२६८१४३

बातम्या आणखी आहेत...