आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवाग म्हणाला-GST लावून टार्गेट दिले, भारताने ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त रन केले तरीही झाला पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात भारताची पराभवाने सुरुवात झाली आहे. पहिल्या T20 सामन्यात कांगारुंनी भारताला 4 धावांनी पराभूत केले. खरं तर ऑस्ट्रेलियाने प्रत्यक्षात केलेल्या केलेल्या धावांपेक्षा भरताने केलेल्या धावा जास्त होत्या, तरीही भारताला पराभव पत्करावा लागला. त्याचे कारण म्हणजे डकवर्थ लुईस नियम. दरम्यान या पराभवानंतर सेहवागने ट्विटरवर गमतीशीर कमेंट केली. 


नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 158 धावा केल्या. पण 16 व्या ओव्हरमध्ये पाऊस आल्याने खेळ थांबला होता. त्यानंतर 3 ओव्हर कमी करण्यात आल्या. त्यामुळे 17 ओव्हर्सचाच सामना झाला. पण अखेरच्या काही ओव्हर्समध्ये मॅक्सवेलने जोरदार धुलाई केली होती. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या सरासरीच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाच्या 158 धावा असूनही भारताला 16 धावांनी अधिक म्हणजे 174 धावांचे आव्हान विजयासाठी देण्यात आले. भारताने प्रत्युत्तरात 17 ओव्हर्समध्ये 169 धावा केल्या. त्यामुळे 4 धावांनी भारत पराभूत झाला. पण प्रत्यक्षात पाहता ऑस्ट्रेलियाने प्रत्यक्षात केलेल्या 158 धावांपेक्षा भारताने 11 धावा जास्त केल्या. तरीही भारत पराभूत झाला. 

 

वीरूचे मजेशीर ट्वीट..

India scoring more than Australia yet losing. Australia ke score par laga GST bhaari pad gaya. But a good thrilling game to start the series.#AUSvIND

— Virender Sehwag (@virendersehwag) November 21, 2018
वीरेंद्र सेहवाग मॅचनंतर एक मजेशीर ट्वीट करत चिमटा काढला. वीरूने लिहिले-ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त रन करूनही भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या स्कोरवर लावलेला GST महागात पडला. पण चांगला सामना झाला. मालिकेची सुरुवात अशा चुरशीच्या सामन्याने झाली हे फार उत्तम. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...