आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्याची बंगळुरू येथील संपत्ती जप्त करा : काेर्टाचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फरार मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याची बंगळुरू येथील मालमत्ता जप्त होणार आहे. दिल्लीच्या चीफ मेट्रोपाॅलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गुरुवारी परकीय चलन विनिमयन अधिनियम (फेरा) कायद्याच्या उल्लंघन प्रकरणात हा आदेश दिला.


चीफ मेट्रोपाॅलिटन मॅजिस्ट्रेट दीपक शेरावत यांनी ईडीचे वकील एन.के. माट्टा यांच्या अपिलावर बंगळुरू पाेलिसांना याबाबत निर्देश दिले. ईडीने काेर्टाचे आदेश लागू करण्यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी, बंगळुरू पोलिसांनी कोर्टाला सांगितले होते की, मल्ल्याच्या शहरात एकूण १५९ मालमत्ता आहेत. मात्र यापैकी एकही जप्त करता आलेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...