आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Selection Of Four Air Force Pilots For Space Missions; India Ready To Become The Fourth Country In The World To Transmitting Human In Space, Training In Russia

अंतराळ मोहिमेसाठी वायुदलाच्या चार वैमानिकांची निवड; रशियात प्रशिक्षण, मानव अंतराळात पाठवणारा जगातील चौथा देश होण्यास भारत सज्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गगनयान चाचणी सुरू : इस्रोने मागील वर्षीच गगनयान बनवले होते. मात्र त्याच्या विविध टप्प्यांतील चाचण्या सुरू आहेत. - Divya Marathi
गगनयान चाचणी सुरू : इस्रोने मागील वर्षीच गगनयान बनवले होते. मात्र त्याच्या विविध टप्प्यांतील चाचण्या सुरू आहेत.
  • यंदा इस्रोच्या 25 पेक्षा जास्त अंतराळ मोहिमा, चांद्रयान-3 पुढील वर्षी
  • अंतराळात किती जण जाणार हे अद्याप निश्चित नाही

​​​​​​​बंगळुरू : मानवाला अंतराळात पाठवण्याची भारतीय मोहीम २०२२ मध्ये पूर्ण होईल. गगनयानातून अंतराळात पाठवण्यासाठी चार वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. चारही पुरुष आहेत, त्यांची नावे जाहीर केली जाणार नाहीत. चाैघेही वायुदलात वैमानिक आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून रशियाच्या रॉसकॉसमॉस संस्थेत त्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी ही माहिती दिली. के. सिवन म्हणाले की, भारतात सध्या अंतराळ प्रवासाच्या प्रशिक्षणाची सोय नाही. ती विकसित करण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे चारही वैमानिक रशियात प्रशिक्षण घेतील. इस्रो यंदा २५ मोहिमांची तयारी करत आहे. गगनयान मोहिमेवर १० हजार कोटी रुपये खर्च येईल. भारताने अंतराळवीर पाठवले तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा चौथा देश ठरेल.

चांद्रयान-३ वर ६१५ कोटी रुपये खर्च

  • चांद्रयान-३ पूर्वीपेक्षा स्वस्त राहील. यात लँडर, रोव्हर असेल ऑर्बिटर नसेल. १४ ते १६ महिन्यांत याचे प्रक्षेपण होईल.
  • देशातील दुसरे अंतराळ केंद्र तामिळनाडूतील तुतीकोरीन येथे होईल, असे के. सिवन यांनी सांगितले.

स्पेससूटची खरेदीही रशियाकडून

इस्रोने अंतराळवीरांसाठी स्पेससूटही बनवला होता. मात्र त्याच्या काही चाचण्या व्हायच्या आहेत. त्यामुळे स्पेससूट रशियाकडून खरेदी करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. यामुळे मानव यान मोहिमेला विलंब होणार नाही.

आधी ३० वैमानिकांची निवड केली होती. त्यापैकी ४ पात्र ठरले

चारही वैमानिकांनी भारताच्या इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन मध्ये शारीरिक, वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय चाचण्या पार केल्या आहेत. रशियातही याच चाचण्या झाल्या. त्यातही हे चौघे उत्तीर्ण झाले. इस्रोने पहिल्या टप्प्यात ३० वैमानिक निवडले होते. त्यातून या चौघांची निवड झाली.

प्रथम दोन वेळा पुतळे पाठवणार, नंतर प्रवासी पथक ठरणार

मानवाला अंतराळात पाठवण्यापूर्वी दोनदा मानवरहित मोहीम प्रक्षेपित होईल. पहिली डिसेंबर २०२०, दुसरी- जुलै २०२१ मध्ये. यात मानवी पुतळे पाठवण्यात येतील व त्याच्या आधारावर गगनयानची सदस्य संख्या ठरेल.