सचिनने निवडलेल्या निवडक / सचिनने निवडलेल्या निवडक कहाण्या... खेळण्यासाठी ‘मोबाइल सोडा, मैदानावर जा’ अभियान 

दिव्य मराठी नेटवर्क

Jan 26,2019 10:55:00 AM IST

दिव्य मराठी स्पेशल- भारत क्रीडाप्रेमी देश आहेच, पण तो खेळणाराही देश बनावा, असे सचिन तेंडुलकरचे स्वप्न आहे. त्याच्या या मोहिमेला साथ देत ‘दिव्य मराठी’ने विशेष स्पर्धा घेतली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत वाचकांकडून आम्हाला ३,१८० प्रवेशिका मिळाल्या. त्यात वाचकांनी खेळांबाबतचे अनोखे अनुभव व चाकोरीबाहेर जाऊन केलेल्या कामांची माहिती दिली. सचिनने ही पत्रेे वाचून त्यातील या ११ कहाण्या निवडल्या...


११ विजेत्यांची नावेे
मालती जायस्वाल, बिलासपूर
धनराज सिंह, उज्जैन
मंजू शर्मा, भरतपूर
निशित आचार्य, अहमदाबाद
मो. अली हिरानी, दुर्ग
सुमन चौधरी, जोधपूर
तरुण कुमार, रांची
हरी महाले, नाशिक

आशा खंडेलवाल, जयपूर
रमेश कहर, मुंबई
सुयश शर्मा

११ वर्षांचा शिक्षक; २ तासांच्या वर्गात १ तास खेळणे आवश्यक

ही गोष्ट आहे ११ वर्षांच्या विहानची. तो वयाच्या चौथ्या वर्षापासूनच क्रिकेटप्रेमी आहे. तेव्हा तो कपडे धुण्याच्या धोपटीने खेळायचा. नंतर त्याला प्लास्टिकची बॅट व चेंडू मिळाला. तो भिंतीवर चेंडू मारून एकटाच खेळायचा. विहान अभ्यासातही हुशार होता. काही वर्षांनंतर तो आपल्याहून लहान मुलांना मोफत शिकवू लागला, जेणेकरून अभ्यासानंतर ती त्याच्यासोबत खेळतील. मुलं रोज १ तास अभ्यास व १ तास खेळायची. यामुळे ती फिट राहू लागली. त्यांचे कुटुंबीयही खुश होते. मुलं दररोज ४ तास खेळायचीच. मी विहानची आत्या, याची साक्षीदार आहे. देशातील प्रत्येक मूल असेच बनावे अशी माझी इच्छा आहे. यामुळे भारत क्रीडाप्रेमी देश, ते खेळणारा देश बनेल.

- मंजू शर्मा, भरतपूर

खेळांमुळे दिव्यांग मुलाचे आयुष्य पालटले, आठ पदकेही जिंकली

खेळ शारीरिक व मानसिक विकासाला कसे प्रभावित करतात याचे माझा मुलगा ईशान हे उदाहरण आहे. तो जन्मत: मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. इतर मुले त्याला टाळायची, वेडा म्हणून हिणवायची. यामुळे मलाही वेदना व्हायच्या. एके दिवशी पॅरागेम्सबद्दल कळले. मी ईशानला घेऊन जयपूरच्या सवाई माधोपूर स्टेडियममध्ये गेले. तिथे अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण सुरू झाले. त्याच्या आयुष्याची दिशाच पालटली. खेळांमुळे त्याच्या मानसिक विकासात बदल झाला. तो शारीरिकदृष्ट्या मजबूत होऊ लागला. वर्षभरातच त्याने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण ८ सुवर्णपदके व एक कांस्यपदक जिंकले. वृत्तपत्रांत त्याचे नाव झळकले. यामुळे त्याचा मान व आत्मविश्वास दुणावला. त्याला एक नवी ओळख मिळाली. आज तो सामान्यांप्रमाणे आयुष्य जगताेय. हा अनुभव त्याला खेळानेच दिला. तो दिवस जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा मला विश्वास आहे.

- आशा खंडेलवाल, जयपूर.

हाफपँटची लाज न बाळगता राज्यस्तरीय चॅम्पियन बनवले
मी जिल्हा पंचायत शाळेत शिक्षिका आहे. आम्ही मुलांना विविध खेळ खेळण्यासाठी प्रेरित करत असतो. आम्ही मुलींसाठी खो-खो सुरू केले. हाफपँट घालून खेळावे लागत असल्याने मुलींनी खेळण्यास नकार दिला. नंतर मुंबईला आमची ट्रिप गेली. जहांगीर आर्ट गॅलरीत हाफ पँट, टी-शर्टमध्ये विदेशी पर्यटक सहजपणे वावरत असल्याचे पाहून मुलींची भीड चेपली. हे खेळण्यासाठी योग्य कपडे आहेत, ते संस्कृतीविरोधात नसल्याचे त्यांना उमगले. खो-खोला त्यांनी होकार दिला. शिक्षकांची वर्गणी करून मुलींसाठी खो-खो ड्रेस आणले. १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींनी मुलांना हरवले. आज या टीमच्या ९ मुली राज्यस्तरीय, तर एक मुलगी राष्ट्रीय खेळाडू आहे.

- हरी महाले, नाशिक

कोच शोधण्यात अडचणी येऊ नये म्हणून वेबसाइट

मी राज्यस्तरीय फुटबॉलपटू आहे. बारावीत शिकतो. फुटबॉल शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात मला अडचणी आल्या. परिसरात चांगल्या प्रशिक्षकाची माहिती घेणे व खेळाशी संबंधित करिअरसाठी कोच मिळवणे याचा समावेश आहे. लोक या समस्यांमुळेच पुढे जाऊ शकत नसतील याची मला जाणीव झाली. मी आणि माझ्या मित्रांनी www.playerconnect.in वेबसाइट तयार केली. त्यात माहिती भरत आहोत. यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस व बॉस्केटबॉल आदी अनेक खेळांबरोबर स्थानिक स्तरावर मार्गदर्शन व माहिती मिळेल. तुमच्या भागतील प्रचलित खेळ, प्रशिक्षक काेण व त्या खेळाबाबत सुविधा आहेत हे यातून कळेल. यासोबत संबंधित शाळेत व अन्य संस्थांद्वारे वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांची माहितीही मिळेल. आमचा उद्देश खेळााद्वारे ओळख बनवू इच्छिणाऱ्या अशा मुलांना व युवांना मदत करणे हा आहे. मात्र, सुविधा व माहितीच्या अभावामुळे असे होऊ शकत नाही.

- सुयश शर्मा

गल्लीतील मुलांना आऊटडोअर गेम्सची ताकद समजावली; मैदाने मुलांनी फुलून गेली
क मी वयात मोबाइलच्या सवयीमुळे मुले एकांतवासात ओढली जातात. आई-वडील मुलांना मोबाइल देऊन आनंदी करण्यात गुंतले आहेत. परिणामी मैदानी खेळापासून मुले दुरावली जात आहेत. माझ्या गल्लीतही अशीच स्थिती होती. गल्लीतील मैदान रिकामे राहत होते. तिथे गाड्या उभ्या केल्या जात होत्या. या सर्वांना त्रासून मी “मोबाइल सोडा-मैदानात या’ मोहीम सुरू केली. मुलांनी मैदानावर वेळ घालवावा हा यामागचा उद्देश होता. आम्ही दोन वर्षांपासून मोहीम चालवत आहोत. सुरुवातीस आम्ही मैदानावरून पार्किंग काढण्याचा निर्णय घेतला. मोबाइलला चिकटून राहिल्याचे नुकसान व बाहेर खेळण्याचे फायदे सांगितले. सर्व तयार झाले वे मैदान भरू लागले आहे. येथील सर्व वयोगटातील मुले खेळत आहेत.
- रमेश कहर, मुंबई

या गावातील १४० स्केटिंग व ८० कराटेपटूंनी जिंकले १० सुवर्णांसह २२ पुरस्कार

गुजरातच्या दसक्रोई तालुक्यात रोपडा गाव आहे. मुलांना खेळाशी जोडण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. याला नोतवाइकांनी प्रतिसाद दिल्यावर शाळेतील १४० मुले आता स्केटिंग करत आहेत. ८० पेक्षा जास्त कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत गावातील शाळेतील १० सुवर्णपदके, ७ रजतपदके व ५ कांस्यपदके मिळाली आहेत. या शाळेतील मुलांनी तीनदा जिल्हास्तरावर खो-खो स्पर्धा जिंकली आहे.

- निशित आचार्य, अहमदाबाद

प्रत्येक व्यक्तीने रोज कमीत कमी एक खेळ खेळावा यासाठी ५५ संघांची केली स्थापना

आपल्या परिसरातील लोकांमध्ये शिक्षण व खेळाप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी माझ्या लष्करी मित्राने एक संघ बनवला आहे. वर्षभरापूर्वी या नजरपूर स्ट्राइकर्स टीममध्ये आज ५५ सदस्य आहेत. आम्ही शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रथम धावतो, नंतर सर्व फुटबॉल, व्हॉलीबॉल किंवा कबड्डी खेळतो. याच्या स्पर्धाही आयोजित करतो. जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतो. आमचा संघ आसपासच्या लोकांना प्रशिक्षण देतो. गेल्या वर्षी आमच्या संघातील ३ सदस्यांची निवड लष्करात झाली. आहे. एवढेच नव्हे तर आमच्या संघातील एका सदस्याची निवड आइन बॉल इंटरनॅशनल कॅम्पसाठी झाली आहे. हे सर्व आम्ही व्यावसायिक प्रशिक्षणाविना किंवा आर्थिक मदतीशिवाय प्राप्त केले आहे.
- धनराज सिंह, उज्जैन

राजस्थान : आदिवासी गावात ८० पेक्षा अधिक राष्ट्रीय फुटबॉलपटू; प्रत्येक घरात खेळाडू; खाण कामगार करतात स्पर्धेचे आयोजन
उदयपूरपासून ४० किमी अंतरावर जावर आणि पालडा ही दोन आदिवासी गावे आहेत. या गावांची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. येथील प्रतिभावंत युवांनी आपल्या मेहनतीच्या बळावर या गावाला ही ओळख मिळवून दिली. त्यामुळेच या गावांना फुटबॉल व्हिलेज म्हटले जाते. या गावातील प्रत्येक घरात एक गुणवंत फुटबॉलपटू तयार झालेला आहे. त्यामुळेच ४१० कुटुंबीय असलेल्या या गावाने आतापर्यंत देशाला ८० पेक्षा अधिक प्रतिभावंत राष्ट्रीय फुटबॉलपटू दिले आहेत. गावातील बाबू मनी, सुब्रतो भट्टाचार्च, मगन सिंग राजवीसारख्या काही गुणवंत खेळाडूंनी फुटबॉल स्पर्धेत देशाचेही प्रतिनिधित्व केले आहे. याच गावातील काही कुटुंबीयांच्या चार पिढ्यांनी फुटबॉलचा वारसा अविरतपणे आणि यशस्वीपणे जपला आहे. यामुळे युवांमधील प्रतिभेला चालना मिळाली. तसेच याच खेळामुळे गावाचा कास वेगाने साकारल्या गेला. याच फुटबॉलच्या बळावर गावातील ५० पेक्षा अधिक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो. येथील झिंक खाणीमध्ये गावातील अनेक खेळाडूंना नोकरीही मिळाली. हे कामगार ४१ वर्षांपासून स्पर्धा आयोजित करतात.

- मुकेश महतो

छत्तीसगड : नक्षलमुक्तीसाठी पुढाकार; जवानांकडून युवांना खेळण्याचे प्रशिक्षण
छत्तीसगडमधील सुकमा हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. येथील चिंतागुफा परिसरात नक्षलांसोबत झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत १५० जवान शहिद झाले आहेत. मोठा संघर्ष येथील नागरिकांना करावा लागत होता. सातत्याने त्याच्यावर टांगती तलवार होती. त्यामुळेच या परिसरात जाण्याचे कोणीही कधी धाडस करत नव्हते. मात्र, केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी या गावाचा कायापालट केला. चोख सुरक्षा व्यवस्थेसह या जवानांनी गावातील नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्याचे मोलाचे कार्य केले. त्यामुळेच येथील नागरिकांमध्ये आता कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही. येथे आता सुख आणि शांतीमुळे लोक आनंदात राहतात. येथील नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी जवानांनी वेगळा प्रयोग केला.

- कौशल स्वर्णबेर

हैदराबाद :दिवसा मजुरी व रात्रीच्या वेळी सराव; फुटबॉलने मिळवून दिली प्रतिष्ठा
हैदराबादच्या बाळापूर परिसरामध्ये म्यानमारमधून पळून आलेल्या रोहिंग्यांची छोटीशी वस्ती आहे. येथे एकूण ४५० ते ५०० रोहिंगे कुटुंबीय राहतात. हे याच ठिकाणी राहून आपला उदरनिर्वाह करतात. त्यासाठी ते दिवसा परिसरात मिळेल त्या ठिकाणी मजुरी करतात. याच कमाईतून ते आपल्या संसाराचा गाडा हाकतात. याच परिसरातील लहान मुले आणि युवकांना आता फुटबॉल खेळण्यासाठीची गोडी लागली. त्यामुळे त्यांना भविष्य उज्वल करण्याचा मार्ग सापडला .
येथील २३ वर्षीय शेख अब्दुल्ला यांच्या दुकानासमोर तुम्हाला नियमितपणे लहान मुले फुटबॉल खेळताना दिसतील. त्यामुळेच याला अब्दुल्ला यांचा रिफ्युजी फुटबॉल क्लब म्हटले जाते. अब्दुल्ला हेच टीमचे कर्णधार आहेत.

-एम. पूर्णिमा

X
COMMENT