आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनापासून दूर राहिलो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे प्राथमिक शिक्षण माझ्या गावात झाले. तेथे आई-वडिलांचे संस्कार आणि धाक होता. पण माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी खोली करून राहू लागलो. इयत्ता आठवीपासून ते आजतागायत शिक्षण अथवा नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूरच राहत आलो आहे. परंतु या काळात मला चांगल्या मित्रांची संगत घडली. त्यांच्यामुळेच मी व्यसनापासून दूर राहिलो. चांगल्या मित्राच्या संगतीत अनेक चांगले अनुभव येत गेले. त्यांनी स्वत:ही व्यसन केले नाही आणि मलाही कधी व्यसन लावण्याचा प्रयत्न केला. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील. आई-वडिलांचा व्यवसाय शेती हाच होता. त्यामुळे ते जेमतेम पैसे पाठवत असत. चैन करण्यासाठी पैसेच कधी मिळाले नाहीत. त्यासाठी आम्ही हट्टही धरला नाही. मित्राच्या घरी गेलो तर त्याच्या आई-वडिलांनी मला चांगली वागणूक दिली. जणू मी त्यांच्या कुटुंबातील असल्याप्रमाणे वाटत असे.

आम्ही मित्रही सुख-दु:खात एकत्र राहिलो. माऊली प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजकारणाची कामे होत असतात. नवे मित्र जोडले गेले तेही संस्कारीच निघाले. आमचा सर्व जाती-धर्मांच्या मित्रांचा समूह आहे. पण कसलेही मतभेद अथवा मनभेद झालेले नाहीत. चांगले मित्र मिळायला भाग्य लागते. अन्यथा वाईट मित्रांच्या नादी लागून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. उमाकांत माने, सतीश कदम, महादेव जाधव यासारखे मित्र आहेत. तसेच मनोज कुलकर्णी, डॉ. प्रताप शिंदे अशा विविध क्षेत्रांतील मंडळींशी माझे ऋणानुबंध जोडले गेले. काही मित्रांची पानटपरी आहे. पण त्यांनी कधीही मला सिगारेट किंवा तंबाखूची ऑफर के ली नाही. हा त्यांचा चांगुलपणाच म्हणावा लागेल.