आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत वेगाने लोकप्रिय होणारा ब्रँड रियलमी (RealMe)ने आपला सेल्फी स्मार्टफोन 'रियलमी यू1' लाँच केला आहे. रियलमीने या स्मार्टफोनमध्ये दोन व्हेरिएंट काढले आहे. या स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम/ 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम /64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे.
'रियलमी यू1'चे फीचर्स
> कंपनीने सांगितल्यानुसार, 'रियलमी यू1'ला मीडियाटेकच्या हेलियो पी70 प्रोसेसरसह लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन 5 डिसेंबरला एक्सक्लूसिव्हली अमेझॉन इंडियावर ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड अशा 3 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
> रियलमी यू1 हा कंपनीच्या 'यू' सीरीजचा पहिला स्मार्टफोन आहे. रियलमी यू1 स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा 25 मेगापिक्सलचा असून यात सोनीचे आयएमएक्स576 सेंसर आणि एफ/2.0 अपरचर आहे. तर रिअर ड्युअल कॅमेरा 12 मेगापिक्सल असुन याचे अपरचर क्रमश: एफ/2.2 आणि एफ/2.4 आहे.
> या स्मार्टफोनमध्ये एआय ब्युटीप्लस मोड, ग्रुपी मोड, बॅकलाइट मोड आणि एआय फेस अनलॉकसारखे अन्य फीचर्सदेखील आहे.
कंपनीने 'रियलमी यू1'मध्ये 6.3 इंचची एफएचडी प्लस एलसीडी डिस्प्ले असून स्क्रिनवर वॉटरड्रॉप नॉच दिले आहे. या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टीम अॅन्ड्राईड 8.1 ओरियोवर आधारीत आहे. तर यात 3,500 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.