आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबूकवर झाली फ्रेंडशिप, नोकरीचे अमीष दाखवून बोलवले आणि केला बलात्कार, नंतर हायवेवर फेकून झाला फरार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ(उत्तर प्रदेश)- फेसबूकवरून मैत्री करून भारतीय सेनेचा जवान सोमवीर यांना हनीट्रॅपमध्ये फसवण्याचे प्रकरण ताजे असताना, आता एका युवतीसोबत बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका 22 वर्षीय युवतीने मेरठ पोलिसांना तक्रारीत सांगितले की, फेसबूकवर झालेल्या मैत्रीनंतर एका प्रॉपर्टी डीलरने नोकरी देण्याचे अमीष दाखवून बोलवले आणि तीन दिवस बलात्कार केला, आणि नंतर हायवेवर फेकून फरार झाला.

 

आरोपीने स्वत:ला प्रॉपर्टी डीलर आणि सपा कार्यकर्ता असल्याचे सांगितले

- शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कंकरखेडा पोलिस ठाण्यात गेलेल्या युवतीने पोलिसांना सांगिल की, ती देहरादूनची राहणारी आहे. तिथे ती कपडे विकण्याचे काम करते. अंदाजे 1 महिन्यांपूर्वी तिची फेसबूकवरून प्रॉपर्टी डीलर अनुज गुर्जरसोबत मैत्री झाली, त्याने स्वत:ची ओळख प्रॉपर्टी डीलर आणि सपा कार्यकर्ता अशी केली होती.

 

- तीन दिवसांपूर्वी तिला अनुजने आपल्या साइट ऑफिसवर असिस्टंटच्या नोकरीसाठी बोलवले होते. त्यानंतर तिला तो नॅशनल हायवेवर असलेल्या आपल्या मित्राच्या गेस्ट हाउसवर घेऊन गेला. त्यानंतर तिला बंदी बनवून तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला आणि नकार दिल्यावर बेदम मारहाण केली.

 

- तिने विरोध केल्यावर आरोपीने तिला बलजबरीन दारू पाजली आणि धुंदीच्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला. नंतर जेव्हा-जेव्हा तिला शुद्ध यायची तेव्हा तो तिला दारू पाजायचा आणि बलात्कार करायचा. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

 

- आरोपीने सलग तीन दिवस बलात्कार केल्यानतंर तिला आपल्या गाडीत बसवून जंगलात नेले आणि चालु गाडीत बेशुद्ध अवस्थेत तिला गाडीतून हायवेवर फेकून दिले. शुद्धीत आल्यानंतर युवतीने थेट पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.


स्वत:ला अनमॅरीड सांगायचा आरोपी

- युवतीने सांगितले की, तिच्या मोबाईलमध्ये आरोपीविरूद्ध पुरावे आहेत. पण आरोपीने तिच्याकडून मोबाईल घेतला आहे, नंतर एका मैत्रिणीने पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला.

 

- आरोपीने स्वत:ला अनमॅरीड सांगितले होते आणि प्रोपाइल फोटोदेखील जुना लावला होता. नंतर फ्लॅटवर आल्यावर त्याने त्याचे लग्न झाले असून 14-14 वर्षांची दोन मुले असल्याचे सांगितले.


सीमेच्या वादाने केली दिशाभुल 
- इंस्पेक्टर कंकरखेडा एपी मिश्रा यांनी घटनेची जागा टीपीनगर परिसरातील असल्याचे सांगून टीपीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले, तर टीपीनगर इंस्पेक्टर डालचंद यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री दोन्ही बाजुच्या लोकांनी मध्यस्थीने प्रकरण मिटवले आहे.

 

- नंतर एसपी सिटी रणविजय सिंह यांच्याकडे प्रकरण गेल्यावर टीपी नगर पोलिस ठाण्यात आरोपी अनुज गुर्जर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या आरोपीचा शोध सुरू असून, युवतीच्या मेडीकल रोपोर्टनंतरच पुढील तपास केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...