आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये ही सावरकरांची इच्छा माेदींनी केली पूर्ण; भाजपने जपली विचारधारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे : भारताकडे काेणीही वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी आपल्याकडे युध्दसामुग्री मुबलक प्रमाणावर पाहिजे, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडले हाेते. त्यांची ही इच्छा केंद्रातील माेदी सरकारने पूर्ण केली. देशाचे सैन्यदलाच्या समक्षता आणि युध्दसामुग्रीवर जगात भारताचा पाचवा क्रमांक लागताे. त्यामुळे इतर काेणत्याही देशाला भारतावर हल्ला करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागेल, असे मत अखिल भारतीय स्वा.सावरकर साहित्य संमेलनाचे उद‌्घाटक तथा भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डाॅ.विनय सहस्त्रबुध्दे यांनी केले. 


शहरात शनिवारपासून आठव्या अखिल भारतीय स्वा.सावरकर साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी विश्वकाेश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर तर प्रमुख म्हणून सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे रवींद्र साठे, स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ.सुभाष भामरे, महापाैर चंद्रकांत साेनार उपस्थित हाेते. याप्रसंगी उद‌्घाटनपर भाषणात डाॅ.सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले की, सावरकरांचे विचार परखड असल्याने अनेकांना त्यांचे विचार पटत नव्हते. मात्र, ते त्यांच्या विचारांवर ठाम हाेते. त्यांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादाची सध्याही आपल्याला गरज आहे. मात्र, त्यांची देशातच उपेक्षाच झाली. त्यांच्या विचारांचा फारसा प्रचार, प्रसार झाला नाही. मात्र, स्वातंत्र्यानंतर त्यांच्या विचारांनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू आहे. त्याच विचारधारेतून भाजपानेही देशभरात सावरकरांच्या विचारांना जागृत करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदींवरही त्यांच्या विचाराचा प्रभाव आहे. त्यांनी सावरकरांच्या विचारांनुसार कार्य सुरू केले आहे. त्यातून देशाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न हाेत आहेत. भारत हा महासत्ता बनविण्यासाठी माेदींकडून प्रयत्न सुरू आहेत. जगात आज भारताकडे पाहण्याचा दृष्टिकाेन बदलला आहे. युध्दसामुग्री, युध्दतंत्रज्ञानात देशाने प्रगती केलेली आहे. इतकेच नव्हे तर स्वत: संशाेधनाचेही कार्य करीत असल्याने आज भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत काेणी करू शकत नाही. सावरकरांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम भाजपाच्या सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

 

संमेलनात आज परिसंवाद अन् समाराेप दाेन दिवसीय संमेलनाचा उद्या रविवारी (दि.३) दुपारी ४ वाजता समाराेप हाेणार आहे. सकाळच्या सत्रात स्वा.सावरकर आणि अत्याधुनिकता या विषयावर प्रकाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद हाेईल. तर दुपारी १२ वाजता डाॅ.अशाेक माेडक यांचे स्वा.सावरकरांचा भारतीय इतिहासातील दृष्टिकाेन या विषयावर व्याख्यान हाेणार आहे. 


परिसंवादांमधून मिळते वैचारिक मेजवाणी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात विविध परिसंवाद हाेत आहेत. या परिसंवादांमधून वैचारिक मेजवाणी मिळते. त्यात राष्ट्रवाद आणि देशप्रेमाने भारावलेल्या सावरकरांच्या जीवनावरील बाबींचा समावेश असताे. प्रखर राष्ट्रवाद काय आहे, हे एेकण्यासाठीच गर्दीही हाेताना दिसते. वक्त्यांच्या भाषणातूनही सावकरांच्या वैचारिकतेचा प्रभाव दिसून येताे. 


राज्यपाल दाैरा रद्द 
स्वा.सावरकर साहित्य संमेलनाच्या उद‌्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागालॅडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य हे उपस्थित राहणार हाेते. त्यांनी संमेलनाचे आमंत्रणही स्वीकारले हाेते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने डाॅक्टरांनी त्यांना सक्तीची दहा दिवसांची विश्रांती सांगितल्याने त्यांना एेनवेळी धुळे दाैरा रद्द करावा लागला. दाैरा रद्द झाल्याची पूर्वसूचना दाेन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला देण्यात आली हाेती. राज्यपाल येणार असल्याने प्रशासनाने त्यांच्या दाैऱ्याची तयारी केली.मात्र, एेनवेळी दाैरा रद्द झाल्याने सर्व तयारी वाया गेली. 

 

परिसंवादाला गर्दी 
सावरकर साहित्य संमेलनातील परिसंवादांना अचानक खच्चून गर्दी झाल्याचा अनुभव आयाेजकांना घ्यावा लागला. त्यामुळे लहान सभागृहातील हा कार्यक्रम सगळ्यांना पाहता यावा व एेकता यावा म्हणून बाहेरच व्यवस्था करण्यात आली. 

 

परिसंवादात मान्यवरांकडून विचारमंथन केले जाते. सावरकर संमेलनानिमित्तही परिसंवादाचे आयाेजन केले गेले हाेते. मात्र आतापर्यंतच्या संमेलनातील परिसंवादाला राहणारी कमी उपस्थिती लक्षात घेऊन आयाेजकांकडून छाेट्या सभागृहात परिसंवाद घेण्याचे नियाेजन केले हाेते. मात्र, पहिल्याच परिसंवादाला माेठी उपस्थिती लाभली. अनेकांनी सभागृहाबाहेर बसून परिसंवादाचा लाभ घेतला. परिसंवादाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आयाेजकांना एेनवेळी कार्यक्रमाचे नियाेजन बदलवून मुख्य सभागृहात परिसंवादाचे आयाेजन करावे लागले. 


सावरकर साहित्य संमेलनातील परिसंवादांना अचानक खच्चून गर्दी झाल्याचा अनुभव आयाेजकांना घ्यावा लागला. त्यामुळे लहान सभागृहातील हा कार्यक्रम सगळ्यांना पाहता यावा व ऐकता यावा म्हणून बाहेरच व्यवस्था करण्यात आली. 

 

परिसंवादात मान्यवरांकडून विचारमंथन केले जाते. सावरकर संमेलनानिमित्तही परिसंवादाचे आयाेजन केले गेले हाेते. मात्र आतापर्यंतच्या संमेलनातील परिसंवादाला राहणारी कमी उपस्थिती लक्षात घेऊन आयाेजकांकडून छाेट्या सभागृहात परिसंवाद घेण्याचे नियाेजन केले हाेते. मात्र, पहिल्याच परिसंवादाला माेठी उपस्थिती लाभली. अनेकांनी सभागृहाबाहेर बसून परिसंवादाचा लाभ घेतला. परिसंवादाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आयाेजकांना एेनवेळी कार्यक्रमाचे नियाेजन बदलवून मुख्य सभागृहात परिसंवादाचे आयाेजन करावे लागले. 

बातम्या आणखी आहेत...