आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव सन्मान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचा जीवनगौरव सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पाच नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून हा सन्मान गोसावी यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी शुक्रवारी दिली.

भडाळे, पारखी, रवींद्र कुलकर्णी यांनाही पुरस्कार
नाट्य परिषदेतर्फे या वेळी माता जानकी पुरस्कार - कलावती भडाळे, प्रपंचलक्ष्मी पुरस्कार - आशा तारे आणि चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार प्रकाश पारखी व रवींद्र कुलकर्णी यांना देण्यात येणार आहेत. पराग आणि वर्षा चौधरी यांना लक्ष्मीनारायण दांपत्य पुरस्कार देण्यात येईल. यानिमित्त परिषदेच्या वतीने 'रंगला लोकरंग' हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.