आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : मध्यप्रदेश सरकारच्या वतीने मंगळवारी गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान यांना किशोर कुमार सन्मान - 2018 ने सन्मानित केले गेले. त्यांना हा पुरस्कार मुंबईला त्यांच्या घरी जाऊन सांस्कृतिक मंत्री डॉ. विजयलक्ष्मी साधो यांनी प्रदान केला. यावेळी वहीदा म्हणाल्या, 'विशिष्ठ वन्य जीवन आणि आणि हिरवळीमुळे मध्य प्रदेश माझे आवडते राज्य आहे.
यामुळे सोहळ्याला हजार राहू शकल्या नव्हत्या वहीदा...
तब्येत ठीक नसल्याच्या कारणाने वहीदा रहमान ऑक्टोबर 2019 मध्ये खंडवामध्ये पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये सामील होऊ शकल्या नव्हत्या. किशोर कुमार सन्मान श्रेष्ठ अभिनय, गायन, दिग्दर्शन इत्यादींसाठी दिला जातो. वहीदा यांनी अशातच वाइल्ड लाइफ फोटोग्राफी सुरु केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.