आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- भाजप नेतृत्वाने युवकांना पुढे करण्याचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ व अनेकदा खासदार राहिलेल्यांना स्वेच्छेने जागा सोडाव्यात, असे संकेत दिले आहेत. त्यानंतर युवा मोर्चाचे बरेच पदाधिकारी निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. त्यापैकी काही केरळमध्ये पक्षाचे खाते उघडण्याची तयारी करत आहेत, तर काही जण बंगालसारख्या राज्यात जाण्यास तयार आहेत. युुवकांना महत्त्व देत पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या सुमारे १५ कोटी मतदारांना आकर्षित करण्याची भाजपची रणनीती आहे. त्यासाठी युवा मोर्चानेच 'पहिले मत मोदींना' ही मोहीम सुरू केली.त्या मोहिमेचा अहवाल रोज रात्री ११ वाजता अमित शहा आणि रामलाल यांना ई-मेल केला जातो.पूनम महाजन यांनी सांगितले की, भाजपच्या युवक कार्यकर्त्यांना तिकीट मागण्याची गरज पडत नाही. शहा दरवेळी सक्षम युवक-युवतींना तिकीट देतात.
पूनम, गौरव, अनुप तिकिटाच्या स्पर्धेत
भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन मुंबईतून पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तर राष्ट्रीय सरचिटणीस गौरव तिवारी रिवा येथून मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनुप अँटनी जोसेफ केरळच्या चालाकुडी जागेसाठी दावा करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.