आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर(वय92) यांचे आज(मंगळवार) सकाळी 11.30 वाजता मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी 12 वाजता धाबा येथील त्यांच्या मुळ गावी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी सिव्हिल लाइन्स चौक अमानखाँ प्लॉट अकोला येथे सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, कॅबीनेट मंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी सुमारे 350 योजना राबवल्या. जिल्हा परिषदेतील त्यांची अध्यक्षपदाची कारकिर्द जिल्हा परिषदेला प्रचंड उंचीवर घेवून जाणारी ठरली. त्यांचे प्रशासनाचा आदर्श आजही सर्वांना सांगितल्या जातो. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रीमंडळात बाबासाहेब धाबेकर यांचा समावेश होता. धाबेकर यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या लहान बंधाऱ्यांना धाबेकर बंधारा असे नाव देवून शिंदे यांनी त्यांना गौरवले होते. धाबेकरांना योजनामहर्षी ही उपाधी बहाल करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...