आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसह लवकरच भाजप प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. विखे पाटलांनी आपला राजीनामा मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सुपूर्द केला. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे. त्यातच राजीनामा दिल्यानंतर आता भाजप प्रवेशाच्या हालचालींना आणखी वेग आला आहे. ते काँग्रेसच्या इतर काही बंडखोर आमदारांसह भारतीय जनता पक्षात जाणार असे सांगितले जात आहे.


राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांनी लोकसभा निवडणुकीत 2.81 लाख मतांनी विजय मिळवला. मुलाने भाजपची वाट धरल्याच्या अवघ्या काही दिवसांतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची तारीख समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.