आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोच्या वरिष्ठ संशोधकाचा राहत्या घऱी आढळला मृतदेह, खूनाचा संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो

हैदराबाद - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे वरिष्ठ संशोधकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी हैदराबाद येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. ते इस्रोच्या बालंगर येथील नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर (एनआरएससी)मध्ये कार्यरत होते. हल्लेखोराने त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

ऑफिसला न गेल्यामुळे साथीदारांनी फोन केला
हैदराबाद पोलिसांच्या मते, मयत एस सुरेश (वय 56) अमरप्रीत भागातील अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये एकटे राहत होते. ते मूळचे केरळचे रहिवासी होते. मंगळवारी सुरेश ऑफिस गेले नसता साथीदारांनी त्यांना फोन केला. पण बराच वेळ होऊनही फोन उचलण्यात आला नाही. 
 

पत्नी चेन्नईच्या बँकेत करते नोकरी
यानंतर सुरेशच्या साथीदारांनी चेन्नईच्या एका बँकेत काम करणाऱ्या त्यांच्या फोनवर संबंधित माहिती सांगितली. यानंतर पत्नी आपल्या पालकांसह हैदराबादेतील फ्लॅटवर दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुरेश जमिनीवर मृतावस्थेत पडलेले आढळून आले. 
 

सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे पोलिस
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सुरेश यांच्या डोक्यावर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्ट येणे अजून बाकी आहे. तपास पथकाने घटना स्थळावरील पुरावे गोळा केले आहे. तसेच बिल्डिंगमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासणे सुरु आहे. 

सुरेश 20 वर्षांपासून हैदराबादेत राहत होते
सुरेश मागील 20 वर्षांपासून हैदराबादेत राहत होते. त्यांची पत्नी बँकेत नोकरी करते. 2005 मध्ये पत्नीची चेन्नईला बदली झाली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलगा अमेरिका तर मुलगी दिल्लीत राहते