आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांचा शुक्रवारी अमृतमहोत्सवी गौरव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी गौरव शुक्रवारी आयोजित केल्याची माहिती डॉ. आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सव गौरव समितीचे राम गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 


सोलापूर शहर-जिल्ह्यातील पुरोगामी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने आयोजिलेला हा सोहळा डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यापूर्वी सायंकाळी पाच वाजता डॉ. साळुंखे यांच्या समग्र ग्रंथसंपदेची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तिला चार हुतात्मा पुतळा येथून प्रारंभ होईल. फडकुले सभागृह येथे सांगता होणार आहे. यानंतर मुख्य सोहळा सुरू होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ज. वि. पवार (मुंबई) यांची उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार, ज्येष्ठ शाहीर डॉ. अजीज नदाफ, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ आदी उपस्थित राहणार आहे. 

 

ग्रंथसंपदेच्या मिरवणुकीत विविध शाळांचे विद्यार्थी -विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, नेते उपस्थित राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. पत्रकार परिषदेस यशवंत फडतरे, अॅड. गोविंद पाटील, शेख समीमुल्ला, सचिन खरात आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...