आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्याम टिळक यांचे पुण्यात निधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भारतीय वायुजीव शास्त्रज्ञ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्याम त्र्यंबक टिळक (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. टिळक यांना अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यांनी तयार केलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या एअर सॅप्लर या यंत्रासाठी  तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. डॉ. टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली वायुजीवशास्त्र या विषयात संशोधन करणाऱ्या ८० विद्यार्थ्यांना पीएचडी मिळाली आहे. देशातील विविध विद्यापीठांमध्ये वायुजीवशास्त्र हा विषय सुरू करून अनेक संशोधन केंद्रे सुरू करण्यात आली. या विषयांवर त्यांनी ११ पुस्तकांचे लेखन केले. तसेच २५० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.