सेन्सेक्स ५०५, निफ्टी / सेन्सेक्स ५०५, निफ्टी १३७ अंकांनी गडगडले; अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका

शेअर बाजारात साेमवारी माेठी घसरण झाली. बीएसईचा ३० शेअर्सचा इंडेक्स ५०५.१३ अंकांनी गडगडला. तो दिवसअखेर ३७,५८५.५१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १३७.४५ अंकांच्या घसरणीसह ११,३७७.७५ अंकांवर आला. अमेरिका आणि चीनमधील वाद आणखी तीव्र होण्याच्या शंकेने बहुतांश आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. बहुतांश विदेशी बाजारांतील कमकुवत संकेत व रुपयातील माेठ्या घसरणीचाही सेन्सेक्समधील घसरणीला हातभार लागला.

वृत्तसंस्था

Sep 18,2018 08:48:00 AM IST

मुंबई- शेअर बाजारात साेमवारी माेठी घसरण झाली. बीएसईचा ३० शेअर्सचा इंडेक्स ५०५.१३ अंकांनी गडगडला. तो दिवसअखेर ३७,५८५.५१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १३७.४५ अंकांच्या घसरणीसह ११,३७७.७५ अंकांवर आला. अमेरिका आणि चीनमधील वाद आणखी तीव्र होण्याच्या शंकेने बहुतांश आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. बहुतांश विदेशी बाजारांतील कमकुवत संकेत व रुपयातील माेठ्या घसरणीचाही सेन्सेक्समधील घसरणीला हातभार लागला.


रुपया पुन्हा गडगडला : इंट्रा डे व्यवहारात रुपया ८३ पैशांच्या घसरणीसह ७२.६९ रुपयांपर्यंत कोसळला. आंतरबँक व्यवहारांत रुपया ६७ पैशांनी गडगडून ७२.५१ रुपयांवर बंद झाला.

X
COMMENT