Stock Market: शेअर / Stock Market: शेअर बाजारात विक्रीचा मारा, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, तर निफ्टीदेखिल 10150 च्या खाली

दिव्य मराठी वेब टीम

Oct 11,2018 10:15:00 AM IST

मुंबई - जागतिक बाजारपेठेतील घसरणीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर पाहायला मिळाला. गुरुवारी सेन्सेक्क 1037.36 अंकांनी घसरून 33,723.53 वर पोहोचला तर निफ्टी 321.5 अंकांनी घसरत 10150 च्या खाली सरकला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2.55 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. बाजारामध्ये सगळीकडे विक्रीचा मारा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


मिडकॅप-स्मॉलकॅप शेअरही घसरले
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा मारा पाहायला मिळत आहे. बीएसईचे मिडकॅप इंडेक्स 3.3 टक्क्यांनी घसरले आहे. तर निफ्टीचे मिडकॅपमधील 100 इंडेक्स मध्ये 3.3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्सचे स्मॉलकॅप इंडेक्सदेखिल 3 टक्क्यांनी घसरले आहे.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण आणि तेजी
सेन्सेक्सवर 30 पैकी 29 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. फक्त ओएनजीसीमध्ये 1.58 टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे. इन्फोसिस, एसबीआय, मारुती, एचयूएल, भारती एअरटेल, TCS, RIL, कोटक बँक, ICICI बँक, HDFC बँक, आयटीसीमध्येही घसरण पाहायला मिळाली.

X
COMMENT