आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स 482 अंकांनी उसळून सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - भारतीय शेअर बाजारात मंगळवारी तेजीची लाट आली. सेन्सेक्स ४८१.५६ अंकांनी उसळून ३७५३५.६६ अंकांवर तर निफ्टी १३३.१५ ने वाढून ११,३०१.२० अंकांवर पोहोचले. हा सहा महिन्यांचा उच्चांक आहे. मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स ३७,५८५ या पातळीवर बंद झाला होता. 


तज्ज्ञांच्या मते, विदेशी गुंतवणुकीतील वाढ, रुपयाची मजबूत स्थिती आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे ही तेजी दिसून आली. आगामी निवडणुकीत एनडीएच्या विजयाच्या कलामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याचे दिसते. सोमवारी  गुंतवणूकदारांनी ३८१० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. सेन्सेक्सने मागील १५ सत्रांत ६.२ टक्क्यांची वाढ नोंदवली.

बातम्या आणखी आहेत...