आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sensex Has Fallen 5088 Points In 26 Sessions Since Its Budget. 19 Lakh Crore Clean

बजेटपासून आतापर्यंत २६ सत्रांत ५०८८ अंक पडला सेन्सेक्स; १९ लाख कोटी साफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रेंट क्रूडच्या दरात सुमारे ३० वर्षांची सर्वात मोठी घसरण नोंदल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीच्या सावटाची शक्यता
  • सोमवारी एका दिवसात गुंतवणूकदारांचे ६.८४ लाख कोटी बुडाले
  • ती महत्त्वाच्या प्रश्नांतून समजून घ्या कच्च्या तेलातील घसरणीचा परिणाम

मुंबई/ नवी दिल्ली - कोरोना विषाणूची भीती आणि येस बँकेच्या संकटामुळे देशातील शेअर बाजारांची स्थिती याआधीच कमकुवत हाेती. आखाती युद्धानंतर क्रूडमध्ये जवळपास तीस वर्षांनंतर वेगवान घसरणीमुळे शेअर बाजारांचा मूड बिघडला. गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांनी जग आर्थिक मंदीच्या तडाख्यात येण्याच्या भीतीमुळे विक्री सुरू केली. भारतीय बाजारही यापासून अस्पश्य राहिले नाहीत. सेन्सेक्स-निफ्टी एका दिवसाच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स १९४१.६७ अंक(५.१७%) घसरून ३५,६३४.९५ वर बंद झाला. एनएसई निफ्टी-५० मध्ये ५३८ अंका(४.९०%)ची घसरण राहिली. हा १०,४५१.४५ वर बंद झाला. दुपारी दीड वाजेच्या जवळपास घसरणीचा दबाव एवढा होता की सेन्सेक्सने २,४६७.४४ अंका(६.५७%)च्या घसरणीसह ३५१०९.१८ च्या नीचांकी स्तराला स्पर्श केला. 


दुसरीकडे, निफ्टीने ६९५ अंका(६.३२%)च्या घसरणीसह १०,२९४.४५ चा नीचांकी स्तर स्पर्श केला. सायंकाळी व्यवसाय समाप्तीत बीएसईचे सर्व क्षेत्रिय निर्देशांक २.८७% ते ९.७४% घसरून बंद झाले. शेअर बाजाराच्या सोमवारच्या ऐतिहासिक घसरणीत बीएसईत गुंतवणूकदारांची संपत्ती ६.८४ लाख कोटींनी (४.७४%) कमी झाली. बीएसईचे बाजार भांडवल १३७.४७ लाख कोटी रु.(४.७४%) कमी झाले. बीएसईचे बाजार भांडवल १३७.४७ लाख कोटी रुपये राहिले. शुक्रवारच्या व्यवसाय समाप्तीवर १४४.३१ लाख कोटी होते. 
जागतिक  परिणाम: आशियाई ५%, युरोपीय ७% जास्त पडले
 

1. ब्रेंट क्रूड ३४ दिवसांत ५२ % पर्यंत पडला

ओपेक देश व रशियातील दर युद्धानंतर ब्रेंट क्रूड३३% घटून ३३.०२ डॉलर प्रति बॅरलवर आले. १९९१ च्या अाखाती युद्धानंतर सुमारे ३० वर्षांत एका दिवसातील मोठी घसरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ६ जानेवारीला ब्रेंट क्रूड ६८.९१ डॉलर प्रति बॅरल होते. म्हणजे, ३४ दिवसांत ५२% आहे.

2. वाईट जागतिक संकेत, अमेरिका-चीनमध्ये घसरण

अमेरिकी बाजार शुक्रवारी घसरणीसह बंद झाले. एसअँडपी ५०० आणि नॅस्डॅक सुमारे २% घसरले होते. आशिया-प्रशांत व युराेपात ७% पेक्षा जास्त घसरण झाली. अमेरिकेत चांगल्या रोजगाराच्या आकड्यानेही मदत मिळाली नाही. फेब्रुवारीत २.७५ लाख नव्या जोडल्या गेल्या. 
 

3. कोरोना विषाणूचा उद्रेक, आता १.०६ लाखांना संसर्ग

भारतात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या ४० झाली आहे. केरळमध्ये ५ नवे रुग्ण समोर आले आहेत. जगभरातील रुग्णांची संख्या १,०६,८९३ झाली आहे. जगात आतापर्यंत ३,६३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत ३६६ जणांचा मृत्यू झाला. १.५ कोटी लाेकांवर प्रवास बंदी लादली आहे.
 

4. येस बँकेचे संकट
 
येस बँक संकटामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक प्रकारच्या निर्बंधामुळे दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम अडकली आहे. यामुळे गुंतवणुकदारामध्ये सतत नकारात्मक संकत जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी या संकटाने शेअर बाजारावर परिणाम टाकला आणि यामुळे विक्रीला प्रोत्साहन मिळाले.
 

ती महत्त्वाच्या प्रश्नांतून समजून घ्या कच्च्या तेलातील घसरणीचा परिणाम
 

1. कच्चे तेल स्वस्त झाल्याने आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील का?

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कच्च्या तेलाशी संबंधित आहेत. सध्याच्या घसरणीमुळे देशाचे अायात बिल कमी होईल. घसरणीचा पूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यास पेट्रोलचे दर ५० रुपये प्रति लिटरपर्यंत येऊ शकतात. मात्र, भविष्यात किमती वाढण्याच्या शक्यतेमुळे ग्राहकांना पूर्ण लाभ कमीच दिला जातो. कर वाढवून किमती जास्त ठेवल्या जाऊ शकतात. दिल्लीत सोमवारी पेट्रोल २४ पैसे घटून ७०.५९ रु. लिटर आणि डिझेल २५ पैसे घटून ६३.२६ रु. लिटर झाले. 
 

2. भारताला फायदा; बाजारात घसरण का?
 
भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आहे. हा आपल्या आवश्यकतेच्या ८४% वाट्याची पूर्तता आयातीतून करतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण आल्याने भारतास फायदा होईल आणि आयात िबल कमी होईल. मात्र, अनेक उद्योग व क्षेत्र असे आहेत, जे तेल व्यवसायाशी संबंधित आहेत. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीही या व्यवसायात आहे. तिचे समभाग १२.३५% घसरून बंद झाले. 
 

3.  कच्च्या तेलातील घसरण सुरू राहील?
 
ओपेक देश आणि रशियात कच्च्या तेल उत्पादन घटवण्यावर संमत्ती झाल्यास क्रूडचे दर पुन्हा एकदा वाढू शकता. मात्र,खूप लवकर अशी शक्यता नाही. यासोबत कोरोना विषाणूच्या परिणामावरही बाजाराचे लक्ष असेल. कोरोना विषाणूवर लवकर नियंत्रण मिळवल्यास चीनसह अनेक देशांतून पुन्हा एकदा कच्च्या तेलाची मागणी वाढेल. तसे झाल्यास दरांत तेजी दिसेल. या किमती सौदी अरेबिया व रशियाावर अवलंबून आहेत.बातम्या आणखी आहेत...