Home | Business | Share Market | Sensex Pass 38000 Level First Time On Thrusday 09 August

Sensex पहिल्यांदा 38000च्या पार, निफ्टी 11500 च्या जवळ पोहोचला, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 09, 2018, 10:52 AM IST

सेन्सेक्स 37,994.51 अंकांवर उघडून काही वेळातच 38,000 च्या पार निघून गेला.

 • Sensex Pass 38000 Level First Time On Thrusday 09 August
  > सेन्सेक्सने 12 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत 19 व्यावसायिक सत्रांत 13 नवे उच्चांक प्रस्थापित केले.
  > निफ्टीने 26 जुलै ते 9 ऑगस्टउरम्यान 9 व्यावसायिक सत्रांमध्ये 9 नवे हाय बनवले.

  मुंबई - शेअर बाजाराने गुरुवारीही नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सेन्सेक्स 37,994.51 अंकांवर उघडून काही वेळातच 38,000 च्या पार निघून गेला. सेन्सेक्सने 38,050.12च्या उच्चस्तराला स्पर्श केला. निफ्टीने 11,493.25 पासून सुरुवात करून 11,495.20 अंकांचा रेकॉर्ड बनवला. एनएसईवर सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. बँक निफ्टीही 28,216 च्या आतापर्यंतच्या सर्वात उच्च स्तरावर पोहोचला.

  मोठ्या कंपन्यांसोबतच मिड आणि लार्ज कॅप शेअर्समध्येही खरेदी पाहण्यात आली. बीएसईचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.5% पर्यँत चढले. निफ्टीच्या 50 पैकी 28 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये 4% पेक्षा जास्त उसळी आली. सन फार्मा, टाटा मोटर्स, एसबीआय आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 1.5% पर्यंत वाढ झाली.

  बाजारात तेजीचे कारण :
  विश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदार सलग खरेदी करत आहेत. कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस सेक्टरच्या शेअर्सची चांगली मागणी पाहिली जात आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी 568.63 कोटी रुपये आणि घरगुती गुंतवणूकदारांनी 30.25 कोटींची खरेदी केली. अनेक मोठ्या कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगले तिमाही निकाल सादर केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) चांगल्या आर्थिक विकासाचा अंदाज व्यक्त केला. या सर्व कारणांमुळे बाजारात तेजी पाहायला मिळाली.

Trending