आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sensex Set Lower Circuit, Trading Stopped For 45 Minutes; Sensex Fell 3103 Points At The Start Of Trading, Nifty Also Down 966 Points, Corona Effect

सेन्सेक्ससह जगातील ७ शेअर बाजारांत लोअर सर्किट, नंतर स्थिती सुधारली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी सेन्सेक्स १३२५.३४ अंक(४.०४%) आणि निफ्टी ३६५.०५ अंक(३.८१%) वाढून बंद
  • रिझर्व्ह बँकेने घोषणेनंतर रुपया ४८ पैसे बळकट झाला, १ डॉलरची किंमत ७३.८०
  • बँकिंग शेअर ११ टक्के घसरल्यानंतर ४.६८% वाढीसह बंद झाले

नवी दिल्ली - शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांत मोठ्या चढ-उतारानंतर बाजारात घसरणीचा टप्पा थांबला. शुक्रवारी सेन्सेक्स १३२५.३४ अंक(४.०४%) आणि निफ्टी ३६५.०५ अंक(३.८१%) वधारून बंद झाला. जागतिक स्थिती, अमेरिकी शेअर बाजारांतील घसरणीमुळे सकाळी भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह खुले झाले. काही अवधीतच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पाहता बाजारात लोअर सर्किट लावावे लागले. त्यामुळे ट्रेडिंग ४५ मिनिटांसाठी थांबवले होते. गेल्या २४ तासांत जगातील ७ शेअर बाजारांत लोअर सर्किट लागले आहे. अमेरिकी बाजार डाऊ जोन्स, नॅस्डॅक, एसअँडपी ५००, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया आणि भारताच्या सेन्सेक्समध्ये लोअर सर्किट लागले. असे असले तरी, सेन्सेक्समध्ये दुसऱ्यांदा व्यवसाय सुरू झाल्यावर एकाच दिवसांत सर्वात मोठी वसुली झाली. सेन्सेक्सचे सर्व सेक्टोरल इंडेक्स हिरव्या निशाणीवर बंद झाले. बीएसई बँकेक्स सुरुवातीच्या व्यवसायात ११.१९ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले.
 

या आठवड्याच्या चार व्यावसायिक सत्रांत सेन्सेक्स ३४७३.१४ अंक घसरला


या दरम्यान सेन्सेक्समध्ये एकूण ३४७३.१४ अंक म्हणजे, ९.२४ टक्के घसरला. कोरोना विषाणूमुळे जागतिक बाजारांसोबत देशांतर्गत बाजारांतही घसरणीचा कल राहिला. या दरम्यान सेन्सेक्समध्ये एकूण ३४७३.१४ अंक म्हणजे, ९.२४ टक्के घसरला. कोरोना विषाणूमुळे जागतिक बाजारांसोबत देशांतर्गत बाजारातही घसरण राहिली. या अवधीत १५.०५ लाख कोटी रु. साफ झाले. शुक्रवारी सेबी आणि सरकारचे आश्वासन तसेच अमेरिकी शेअर बाजारातील सुधारणेच्या आशेच्या जोरावर सेन्सेक्स वाढीसह बंद झाला.
 

२००८ च्या मंदीनंतर प्रथमचे लोअर सर्किट
 
शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात २००८ च्या जागतिक मंदीनंतर प्रथमच लोअर सर्किट लागले. शेअर बाजारात अचानक आलेला चढ-उतार रोखण्यासाठी सर्किट लावले जाते. हे दोन प्रकारचे असते. अपर सर्किट आणि लोअर सर्किट. अपर सर्किट हे बाजार ठरलेल्या सीमेपेक्षा जास्त वाढल्यावर लागते. या सीमेपेक्षा जास्त घसरल्यास लोअर सर्किटचा वापर केला जातो.  सर्किटसाठी मर्यादा १०%, १५% आणि २०% निश्चित आहे.
 सेन्सेक्स : आतापर्यंत पाच वेळ लोअर सर्किट लागले, १९९० मध्ये झाला होता वापर


> २१ डिसेंबर १९९० : सेन्सेक्समध्ये १६.१९% ची घसरण नोंदली होती. या घसरणीनंतर शेअर बाजार १०३४.९६ च्या पातळीवर पोहोचला होता.

> २८ एप्रिल १९९२ : तेव्हा सेन्सेक्समध्ये १२.७७%ची घसरण नाेंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ३८९६.९०च्या पातळीवर बंद झाला होता.

> १७ मे २००४ : शेअर बाजारात ११.१४% ची घसरण नोंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ४५०५.१६ च्या पातळीवर बंद झाला होता.

> २४ ऑक्टोबर २००८ : सेन्सेक्समध्ये १०.९६%ची घसरण नोंदली होती. त्या दिवशी शेअर बाजार ८७०१.०७ च्या पातळीवर बंद झाला होता.

> १३ मार्च २०२० : सेन्सेक्स ११% कोसळला, यानंतर लोअर सर्किट लागले. यानंतर बाजार ४५ मिनिटांपर्यंत बंद करावा लागला. 
 

४० टक्के घसरले क्रिप्टोकरन्सीचे मूल्य


कोरोना विषाणूमुळे बाजारातील मंदीमुळे क्रिप्टोकरन्सीचे बाजार भांडवल गेल्या २४ तासांत ४० टक्के घटले. कॉइन मार्केट डॉटनुसार, त्यांचे एकूण बाजार भांडवल ६.९० लाख कोटी रु.(९३.५ अब्ज डॉलर) राहिले. सिंगापूरच्या वेळेनुसार गुरुवारी सकाळी १० वाजेपासून ते शुक्रवारी सकाळी १० पर्यंत बिटक्वाइनचे मूल्यही ४८%घटले होते व एका बिटक्वाइनचे मूल्य ४००० डॉलर झाले होते. शुक्रवारी सायंकाळी याची किंमत परत ५५०० डॉलर प्रतिकॉइन पोहोचली.
 बातम्या आणखी आहेत...