आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्समध्ये २४८ अंकांची घसरण, महिन्यातील नीचांक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निफ्टीही ८०.७० अंकांच्या नुकसानीसह ११,८५६.८० अंकावर बंद झाला

मुंबई- तेल आणि नैसर्गिक वायू तसेच आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी विक्री, रुपयाच्या बळकटीत सेन्सेक्स मंगळवारी २४८ अंक कोसळत ४०,२३९ अंकांवर आला. हा सेन्सेक्सचा एका महिन्यातील किमान स्तर आहे. सेन्सेक्स ४०,५८८.८१ अंकाच्या बळकटीसह खुला झाला, मात्र हा लवकरच नकारात्मक कक्षेत आला आहे. निफ्टीही ८०.७० अंक किंवा ०.६८ टक्क्यांच्या नुकसानीतून ११,८५६.८० अंकावर बंद झाला.सेन्सेक्सच्या कंपन्यांमध्ये येस बँकेत सर्वाधिक १०.०५ टक्के घसरण आली आहे. पॉवरग्रिड, इंडसइंड बँक, एनपीटीसी, आयटीसी, टीसीएस, अॅक्सिस बँक, हिरो मोटोकाूर्प, महिंद्रा अँड महिंद्रा व एचसीएल टेकमध्ये २.६६% नुकसानीचा अंदाज राहिला. बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज ऑटोच्या समभाग १.०६ टक्क्यांपर्यँत वधारले होते. मागील काही दिवसांत सलग उसळणाऱ्या शेअर बाजाराने गुुंतवणूकदार सुखावले होते.