आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मारुती अल्टो, स्विफ्ट डिझायर किंवा बलेनो नाही...तर ही ठरली भारताची सर्वात जास्त विकणारी गाडी, किंमत 5 लाखांपेक्षा कमी आणि मायलेज 28 पेक्षा जास्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर 2018 मध्ये पुन्हा एकदा मारुती बेस्ट सेलिंग कार ठरली.'Cumulative Sales Report August 2018' नुसार टॉप-10 च्या लिस्टमध्ये मारुतीचे 7 मॉडेल समाविष्ट आहेत. यामध्ये पहिल्या सहा क्रमांकावर मारुतीच्या गाड्या आहेत. परंतु नेहमी टॉपवर राहणारी अल्टो कार यावेळेस सेकंड पोझिशनवर आहे. लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर स्विफ्ट आहे. कंपनीने यावर्षी स्विफ्टचे नवीन मॉडेल लॉन्च केले आणि या मॉडेलची डिमांड आजही कायम आहे. भारताच्या मार्केटमध्ये स्विफ्टची किंमत 4.99 लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) पासून सुरु आहे. रिपोर्टनुसार मागील महिन्यात स्विफ्टचे 22,228 यूनिट सेल झाले.

 

टॉप-10 सेल कार

रँक मॉडल यूनिट सेल

1

Maruti Swift 22,228
2 Maruti Alto 21,719
3 Maruti Dzire 21,296
4 Maruti Baleno 18,631

5

Maruti Brezza 14,425
6 Maruti WagonR 13,252
7 Hyundai i20 12,380
8 Hyundai Grand i10 11,224
9 Hyundai Creta 11,000
10 Maruti Celerio 9,208
 

 

दमदार मायलेज
नवीन स्विफ्टचा व्हीलबेस 20 एमएम आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत या कारचे वजन 85 किलो कमी आहे. यामुळे याचे मायलेज चांगले झाले आहे. डिझल कारचे मायलेज 28.4 किलोमीटर आणि पेट्रोल कारचे मायलेज 22 किलोमीटर प्रति लिटर आहे.


पावरफुल इंजिन
स्विफ्टमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 Rpm वर 83 पीएसची पावर आणि  4,200 Rpm वर 113 Nm चा पीक टॉर्क जेनरेट करते. नवीन डिझल स्विफ्टमध्ये 1.3 लीटरचे मल्टीजेट इंजिन आहे. हे इंजिन 2,000 Rpm वर 190 Nm टॉर्क जेनरेट करते. यासोबतच 4,000 Rpm वर 75 पीएस पवार देते. दोन्ही मॉडेलला 5 स्पीड गियरबॉक्स आहे. स्विफ्टचे एकूण 12 मॉडेल आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक मॉडेलही आहे. 


नवीन स्विफ्टमध्ये या आहेत खास गोष्टी...
1. स्पोर्टी आणि दमदार लुक
2. मजबूत बॉडी सेक्शन आणि एयरोडायनामिक काउंटर्स
3. 5th जनरेशन हार्टेक्ट प्लॅटफॉर्म
4. इझी ड्राइव्ह टेक्नॉलॉजी

बातम्या आणखी आहेत...