आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांकडे तक्रार:सातारा परिसरातील रस्त्यावर सेप्टिक टँक, घाणीमुळे रोगराईचा धोका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा परिसरातील छत्रपती नगर भागात पूजा पार्कलगत (अयप्पा मंदिर परिसर) रस्त्यावर बांधण्यात आलेल्या सेप्टिक टँकमुळे घाण पाणी व मैला रस्त्यावर वाहत असून यामुळे शेजारील दुकाने व रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय जाणाऱ्या-येणाऱ्यांना, शेजाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून रस्त्यावरील हा शौच खड्डा तत्काळ बुजवून पर्यायी व्यवस्था द्यावी व परिसरात होणारी घाण थांबवावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...