फोर्ब्स यादी / सेरेना सलग चौथ्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू; सिंधूची कमाई २१ कोटींनी कमी झाली, अव्वल १० मधून बाहेर

फोर्ब्जने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली

वृत्तसंस्था

Aug 08,2019 09:22:00 AM IST

न्यूयॉर्क - अमेरिकन टेनिसपटू सेरेना विलियम्स सलग चौथ्या वर्षी जागतील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू बनली. दुसऱ्या स्थानावर नाओमी ओसाका आहे. ३७ वर्षीय सेरेनाने २०७ कोटी रुपये आणि २१ वर्षीय ओसाकाने १७२ कोटी रुपयांची कमाई केली. फोर्ब्जने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल १५ महिला खेळाडूंची यादी जाहीर केली. अव्वल १० मध्ये सर्व टेनिसपटू आहेत. भारताच्या पी.व्ही. सिंधू १३ व्या स्थानी घसरण झाली. ती गेल्या वर्षी सातव्या स्थानावर होती. २४ वर्षीय सिंधूची कमाई गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ कोटी रुपयांची कमी झाली. त्यांनी या वर्षी ३९ कोटी रुपयांची कमाई केली. यादीत सिंधू एकमेव भारतीय खेळाडू आहे.
ओसाकाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूएस ओपनच्या फायनलमध्ये सेरेनाला हरवले होते. तिने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनदेखील जिंकली. बक्षीस रकमेसह करारातून तिची कमाई होते. गेल्या वर्षी करारातून तिने ११ कोटी रुपये कमावले. यंदा १० टक्के वाढून ११३ कोटी रुपये झाले, इतर रक्कम तिला बक्षिसातून मिळाली. ओसाका केवळी चौथी खेळाडू आहे, जिने एका वर्षात २० मिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई केली. यापूर्वी, सेरेनासह रशियाच्या मारिया शारापोवा आणि चीनच्या ली ना यांनी अशी कामगिरी केली. सेरेना आणि ओसाका तिसऱ्या स्थानावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जर्मनीच्या अँजलिक कर्बरपेक्षा दुप्पट कमाई करतात. ३१ वर्षीय कर्बरची कमाई ८४ कोटी रुपये आहे.

अव्वल दहांत सर्व टेनिसपटू

खेळाडू देश कमाई*
सेरेना अमेरिका २०७
ओसाका जपान १७२
कर्बर जर्मनी ८४
हालेप रोमानिया ७२
स्टीफन्स अमेरिका ६८
वोज्नियाकी डेन्मार्क ५३
शारापोवा रशिया ५०
प्लिसकोवा चेक रिपब्लिक ४५
स्वितोलिना युक्रेन ४३
व्हीनस अमेरिका ४२
(*कमाई कोटी रुपयांत)

X
COMMENT