आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Serena's First Win After Becoming A Mother; The Prize Money Was Given To The Fire Victims

आई झाल्यानंतर सेरेनाने जिंकला पहिला किताब; बक्षिसाची रक्कम आग पीडितांना दिली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलंड : अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सने ऑकलंड ओपन किताब जिंकला. सेरेनाने आई बनल्यानंतर पहिला किताब आपल्या नावे केला. ३८ वर्षीय सेेरेनाने तीन वर्षांनी कोणता किताब जिंकला. अखेरच्या वेळी तिने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियान ओपन किताब जिंकला होता.

फायनलमध्ये तिने आपल्याच देशाच्या जेसिका पिगुलाला सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ ने हरवले. २३ वेळेची ग्रँडस्लॅम एकेरीची विजेता सेरेनाचा हा करिअरमधील ७१ वा किताब ठरला. सेरेनाला विजयानंतर जवळपास ३१ लाख रुपये बक्षीस मिळाले. तिने ही रक्कम ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीतील पीडितंाना देण्याची घोषणा केली. दुसरीकडे मात्र दुहेरीच्या फायनलमध्ये सेरेना व डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकी जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. सेरेना आता २० जानेवारीपासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उतरेल. तिने एकेरीचा किताब जिंकल्यास ऑस्ट्रेलियाच्या मार्गेट कोर्टच्या २४ किताबाशी बरोबरी करेल. सेरेनाने म्हटले, ती दीर्घकाळापासून टेनिस खेळत आहे. मला आनंद वाटतो, मला ज्या गोष्टीची आवड आहे, ती करू शकते. अाता सत्रातील पहिल्या ग्रंॅडस्लॅम किताबासाठी सेरेना उत्सुक अाहे. यासाठी तिने कसून मेहनत घेतली अाहे. त्यामुळे अाता तिला तब्बल दाेन वर्षांनंतर विजेतेपदाचा बहुमान मिळवता अाला. यातूनच तिची सत्राला किताबाने दमदार सुरुवात झाली अाहे.
 

बातम्या आणखी आहेत...