आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरीयल किलरने मुलासाठी सांगितली 30 मर्डरची कहाणी, कोडवर्डमध्ये बोलायचा-मृतदेहाला म्हणायचे कचरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - हायवेवर ट्रक चोरी करून ड्रायव्हर आणि क्लिनर्सच्या हत्या करणाऱ्या सिरियल किलर आदेश खामराला पोलिसांनी अटक केली. पण चौकशीत तो काहीही सांगायला तयार नव्हता. पोलिसांनी जेव्हा केसमध्ये मुलालाही आरोपी बनवणार असे म्हटले त्यावर त्याने सर्वकाही सांगितले. आदेशचे पूर्वज मूळच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतातून आलेले आहेत. पत्नी आणि मुलावर त्याचे प्रचंड प्रेम आहे. त्यांना काहीही सांगितले नसल्याचे तो म्हणाला. 


पार्टी देण्याच्या नावाखाली तर कधी मोबाईल चार्जिंगच्या नावाने लोकांना फसवायचा 
- आदेशचा पार्टनर जयकरण ट्रक ड्रायव्हरना कधी पार्टी देण्याच्या नावाखाली तर कधी मोबाईल चार्जिंगच्या नावाने लोकांना फसवायचा. पोलिसांना ग्वाल्हेर आणि झाशीतूनही काही असेच पुरावे मिळाले. जयकरण आदेशसाठी जे करायचा तेच 2007 मध्ये झांशीच्या गँगने केले होते. ते म्हणजे ट्रक ड्रायव्हर-क्लिनरला अडकवण्याचे काम. पोलिसांनी सांगितले की, आदेशने अनेक चुका केल्या होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या मर्डरमध्ये त्याने ड्रायव्हर आणि क्लिनरची हत्या केल्यानंतर त्यांना कपड्यांसह फेकले होते. पण पोलिस कपड्यांवरून मृतदेहांची ओळख पटवेल म्हणून त्याने नंतर कपडे काढून मृतदेह पाण्यात फेकणे सुरू केले. माशांनी मृतदेह खाऊन एवढा खराब करावा की कोणाला ओळखू येऊ नये हा पाण्याच फेकण्यामागचा उद्देश 

 
कोडवर्डमध्ये बोलायचे 
अनेक राज्यांत पसरलेल्या या गँगचे सदस्य कोडवर्डमध्येच बोलायचे. जयकरणचे काम ट्रक ड्रायव्हर-क्लिनरना अडकवणे हे होते. तो आदेशला फोनवर म्हणायचा, कुछ मीठा तो खिला दो याचा अर्थ ड्राइव्हर त्याच्या तावडीत अडकला आहे, तुम्ही या त्यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करा, असा होतो. ग्वाल्हेरच्या गँगचे काम ट्रकच्या मालाची विक्री करणे होते. या गँगला जयकरणने ट्रक लुटला हे समजताच ते पोनवर म्हणायचे, कचरा रस्त्यात फेकून या. म्हणजे मृतदेह फेकून या. 

 
पैशाच्या हव्यासापोटी बनला सिरियल किलर.. 
आदेश आधी टेलरिंग काम करायचा. त्यात फार पैसा मिळत नव्हता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणेही शक्य नव्हते. गुन्हेगार मित्रांच्या संगतीमुळे त्याने 2007 मध्ये पहिल्यांदा ट्रक लुटली. त्यात कोणालाही मारले नव्हते. त्याने 2008 मध्ये पहिली हत्या केली. सहज पैसा मिळावा यासाठी तो हत्या करतच राहिला. 

 
यामुळे झाला तपासाला उशीर 
पोलिस तपासात समोर आले की, आदेश आणि जयकरण यांनी लुटलेले ट्रक तर कधीही परत मिळाने नाही. पण या हे ट्रक चोरी किंवा लूटल्याची माहिती देत मालक इंश्युरन्स कंपनीकडून क्लेम घ्यायचे. एका शहरात लुटलेल्या ठ्रकच्या ड्रायव्हर-क्लिनरचे मृतदेह दूसऱ्या शहरात मिळायचे. त्या शहरातील पोलिसांसाठी ते अनोळखी असायचे. त्यामुळे तपासातही गांभीर्य नसायचे. 

 

काही प्रश्न.. 
टाटाच्याच ट्रकची चोरी कशासाठी?

- कारण या ट्रकचा रिसेल व्हॅल्यू जास्त असायची. संख्या जास्त असल्याने ओळखू येत नव्हते. 


युपी-बिहारमध्ये का न्यायचे?
- कारण त्याठिकाणी चेकिंगची भिती कमी आहे. यहां चैकिंग का डर कम है।

 
लूट-हत्येशिवाय इतर काही प्रकरणे तर नाहीत?
- आतापर्यंत तर असे काही पुरावे मिळालेले नाहीत. 

 
विमा क्लेमचे का होते ? 
- बहुतांश प्रकरणात प्रकरण मिटतात विम्याचे क्लेम घेतले जातात.  
 

किती कोटींचा व्यवहार?
आतापर्यक 5 कोटींचा व्यवहार यातून झाल्याचा खुलासा झाला आहे. 

 
पाच कोटींच्या चोरीचा अंदाज 
पोलिस सध्या आदेश आणि जयकरणने मिळून पाच कोटींपेक्षा जास्तीच्या चोऱ्या केल्याचा अंदाज वर्तवत आहेत. या गँगने फक्त 12 किंवा 14 चाकी ट्रकच्याच चोऱ्या केल्या. त्याची किंमत 15 लाख रुपये असते. काही ट्रकतर माल भरलेला असताना लुटल्या गेल्या. त्यामुळे 15 हून अधिक प्रकरणांत 5 कोटींपेक्षा अधिकची लूट केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...