आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Serial Killer Of China Executed For Murder Of 11 Women And Girls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या किलरच्या भीतीने लाल कपडे घालायला घाबरायच्या तरुणी, बलात्कारानंतर कापून टाकायचा प्रायव्हेट पार्टस्

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाल कपडे परिधान केलेल्या तरुणी पाहताच करायचा पाठलाग
  • पहिल्या घटनेच्या 28 वर्षांनंतर झाली होती अटक, 'जॅक द रिपर'शी व्हायची तुलना 

बीजिंग - चीनमध्ये 11 महिलांची हत्या करणारा सिरियल किलर गाओ चेंगयोंगला नुकतीच मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. गाओला गेल्यावर्षी शिक्षा सुनावली होती. तो तरुणी आणि महिलांबरोबर बलात्कार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करायचा. विशेष म्हणजे हा फक्त अशा तरुणींनाच शिकार बनवायचा ज्यांनी लाल कपडे परिधान केलेले असले. घटनांची पद्धत सारखीच असल्याने त्याची तुलना चीनच्या 'जॅक द रिपर' शी व्हायची. 

28 वर्षांना पोलिसांना मिळाले पकडण्यात यश...


- गाओ चेंगयोंग (54) ने 1988 ते 2002 दरम्यान 11 महिलांची हत्या केली होती. तो महिलांचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचा. नंतर त्या एकट्या असताना त्यांच्यावर बलात्कार करून निर्घृणपणे त्यांची हत्या करायचा. लाल कपडे परिधान केलेल्या तरुणींवरच तो हल्ला करायचा. ।
- हत्येनंतर तो अत्यंत निर्घृणपणे तरुणींचे कान, नाक, गळा असे अवयव आणि प्रायव्हेट पार्ट कापायचा.  
- त्याने हत्या केलेल्या बहुतांश तरुणींचे वय 20 च्या आसपास होते. आरोपीने एका 8 वर्षांच्या मुलीवरही हल्ला केला होता. 
- गाओला पकडण्यासाठी पोलिसांना 28 वर्षे लागली. 2016 मध्ये त्याला अटक झाली होती. तो विकृत होता आणि महिलांचा द्वेष करायचा.