आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Serial 'Sanjivani' Season 2 First Look Released On Doctor's Day, Returning On Small Screen After 17 Years

17 वर्षांनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार सिरीयल 'संजीवनी', डॉक्टर्स डेला रिलीज झाला पहिला लुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : टीव्ही शो 'संजीवनी' चे दुसरे सीजन लवकरच येणार आहे. नॅशनल डॉक्टर्स डेला याचा फर्स्ट लुक समोर आला आहे. या नाच्या सीजनमध्ये काही जुने तर काही नवे चेहरे असणार आहेत. नव्या सीजनमध्ये सुरभी चंदना, सयंतनी घोष आणि नमित खन्ना हे नवे चेहरे दिसणार आहेत. तसेच मोहनीश बहल आणि गुरदीप कोहली जुन्या सीजनचे चेहरे आहेत जे यावेळीही शोचा भाग असणार आहेत. 

 

चार वर्षे चालले होते पहिले सीजन... 
'संजीवनी' हा शो 2002 सुरु झाला होता आणि खूप हिटदेखील झाला होता. या शोमध्ये गुरदीप कोहली, संजीत बेदी, मीहिर मिश्रा आणि मोहनीश बहलने मुख्य रोल प्ले केले होते. हा शो 2005 पर्यंत चालला होता आणि पूर्ण टीमसाठी एक टर्निंग पॉइंट ठरला होता. हा शो स्टार प्लसवर टेलिकास्ट होणार आहे. चॅनलच्या ऑफिशियल ट्विटर हैंडलवर या शोचा फर्स्ट लुक शेअर केला गेला आहे.   

 

 

आशा आहे यावेळी मिळेल प्रेक्षकांचे प्रेम - गुरदीप कोहली... 
नव्या सीजनविषयी गुरदीप कोहलीने सांगितले, 'संजीवनी प्रेक्षकांसाठी एक खूप खास शो होता. मला आठवते की, 'संजीवनी सीजन 1' दरम्यान आणि त्यानंतरही नि तरुण तरुणींना भेटले, ज्यांनी आमच्या शोमुळे मेडिकल हे प्रोफेशन निवडले. दर्शक आमच्या रुग्णालयाची पूजा करायचे आणि शोमधील सर्वच भूमिकांना खूप प्रेम मिळाले. बस एवढेच सांगू इच्छिते की, मी डॉ. जूही बनून पुन्हा एकदा 'संजीवनी' सोबत दिसणार आहे. ज्यासाठी मी खूप उत्साहित आहे. आशा आहे की, जे प्रेम मला पहिल्या सीजनयामध्ये मिळाले ते यावर्षीही मिळेल.'

 

मी याच शोने केला होता टीव्हीवर डेब्यू - मोहनीश बहल... 
मोहनीश बहलने संजीवनीबद्दल सांगितले, 'आधीचे सीजन खूप अविस्मरणीय होते, हा एक आयकॉनिक शो होता, त्यासोबत मी टेलिव्हिजनवर आपला डेब्यू केळक होता आणि आता 17 वर्षांनंतर पुन्हा हा शो परतनर आहे. यावेळी आम्ही आधीपेक्षा जास्त मॅच्युअर आणि माणुसकीच्या भावनांसोबत हा शो घेऊन परत आलो आहोत.'