आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 वर्षांमध्ये 4 वेळा वर्ल्ड कपपूर्वी विदेश दौरा, 2 वेळा फायनल 2 वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचला भारत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाला केवळ ४ महिने राहिले. त्यापूर्वी आपल्याला २ वनडे मालिका खेळायच्या आहेत. एक न्यूझीलंडमध्ये व त्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येईल. हा विदेश दौरा आपल्यासाठी फायद्याचा ठरला आहे. 


नवी दिल्ली - टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. टीमला येथे ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. पहिला वनडे २३ जानेवारीला नेपियरमध्ये खेळवला जाईल. 

 

येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा अखेरचा विदेशी दौरा आहे. गेल्या ३६ वर्षांत टीम इंडिया विश्वचषकापूर्वी विदेश दौरा करतेय, असे पाचव्यांदा होत आहे. हे विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाचे आहे, टीमला त्याचा निश्चित फायदा होईल. भारत १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा विश्वविजेता बनला होता. तेव्हापासून २०१५ पर्यंत सहा विश्वचषक आशिया बाहेर झाले. यात चार विश्वचषकांपूर्वी स्वत:ला आजमावण्यासाठी भारतीय संघाने विदेश दौरा केला. याचा टीमला निश्चित फायदा झाला. चारपैकी ३ वेळा भारतीय संघ कमीत कमी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. भारत एक वेळ विजेता आणि एकदा उपविजेता ठरला. 

 

1983: : विंडिज व पाकमध्ये पराभव; नंतर विश्वचषक जिंकला 
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापूर्वी भारत पाकमध्ये वनडे मालिकेत १-३ ने व विंडिजमध्ये १-२ ने हरला. त्यानंतरदेखील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला हाेता. 

 

2003: न्यूझीलंडची मालिका गमावली; नंतर फायनलमध्ये 
द. आफ्रिकामध्ये विश्वचषकापूर्वी भारताने वनडे मालिका न्यूझीलंडविरुद्ध २-५ ने गमावली. नंतर टीमने विश्वचषकाची फायनल गाठली. 

विश्वचषकापूर्वी ३६ वर्षांत ४ वेळा विदेशी मालिका खेळल्याने संघ ३ वेळा पोहोचला उपांत्य फेरीत 


1992: ऑस्ट्रेलियात सिरीज खेळली; पहिल्या फेरीतून बाहेर 
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियात वनडे वर्ल्ड सिरीज खेळली. विश्वचषकात भारत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवू शकली नाही. 

 

2015: ऑस्ट्रेलियात मालिका गमावली; त्यानंतर उपांत्य फेरीत 
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये विश्वचषकापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेत ३ सामने गमावले. टीमने विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली. 

 

2007: पहिल्याच फेरीतून संघ झाला बाहेर 
२००७ चा विश्वचषक वेस्ट इंडीजमध्ये झाला. यापूर्वी २ वनडे मालिका भारताने आपल्या धर्तीवर खेळल्या. वेस्ट इंडीजला ३-१ व श्रीलंकेला २-१ ने मात दिली. मात्र, विश्वचषकात भारत पहिल्याच फेरीतून बाहेर झाला. टीम १९९९ मध्ये विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचू शकला नाही. 
टीप : १९८७, १९९६, २०११ विश्वचषक आशियाई देशांत झाले. 

 

भारत व न्यूझीलंड यांच्यात ४३ वर्षांतील आठवी मालिका, आतापर्यंत मिळाला केवळ एकच विजय 
टीम इंडियाची ही न्यूझीलंडसोबत आठवी द्विपक्षीय वनडे मालिका आहे. दोन्ही देशांत पहिली मालिका १९७६ मध्ये खेळवली गेली. तेव्हा टीम इंडिया ०-२ ने हरली. सात द्विपक्षीय मालिकांत न्यूझीलंडने चार आणि भारताने एकात विजय मिळवला. दोन मालिका बरोबरीत राहिल्या. भारताचा पहिल्यांदा २००९ मध्ये ३-१ ने मालिका विजय झाला. 


कोहलीची २ शतके, सर्वाधिक शतक करणारा भारतीय 
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके वीरेंद्र सेहवागने केली. कोहलीने पाच शतके झळकावली. मालिकेत दोन शतके काढल्यास तो सर्वात पुढे जाईल. कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध १९ सामन्यांत ७२ च्या सरासरीने ११५४ धावा काढल्या. यात ६ अर्धशतके आहेत. ताे सर्वाधिक धावा करण्यातदेखील तिसऱ्या स्थानावर अाहे. सचिन तेंडुलकरने (१७५०) आणि सेहवाग (११५७) त्याच्या पुढे आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...