मनमाड: सराईत गुन्हेगाराकडून / मनमाड: सराईत गुन्हेगाराकडून पाेलिस अधिकांऱ्यावर काेयत्याने हल्ला

प्रतिनिधी

Jan 03,2019 07:38:00 AM IST

मनमाड- नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये सराईत गुन्हेगाराने सहायक पाेलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यावर काेयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सूरज कन्हैयालाल चुनियान नामक हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.

दहशत निर्माण करणे, दुखापत,चाेरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले सूरज चुनियान व त्याचा भाऊ शुभम चुनियान हे दोघेही घातक शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार गस्तीवर असलेले सहायक पाेलिस निरीक्षक आर. जी. गलांडे व कर्मचारी गवळी त्यांचा शाेध घेत हाेते. रात्री दीड वाजेच्या सुमारास सूरज हा दुचाकीने तेली गल्लीतून जाताना त्यांना दिसला. त्यांनी अडवताच सूरजने दुचाकीत लपवून ठेवलेला काेयता काढून पाेलिस कर्मचारी गवळींवर वार केला आणि पळ काढला. पाेलिस अधिकारी गलांडे यांनी पाठलाग करून सूरजला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूरजने गलांडे यांच्यावरही काेयत्याने हल्ला करून पलायन केले. जखमी गलांडे व गवळी यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. उपचारानंतर दुपारी दाेघांना सुटी मिळाली. याप्रकरणी मनमाड पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

X