आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 पोळ्यां कमी खायला दिल्यामुळे नोकराने मालकिणीची केली हत्या, म्हणाला- 7 पोळ्यांची भुक असायची पण फक्त 5 मिळायच्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर(हरियाणा)- येथील एका नोकराने दोन पोळ्यांसाठी आपल्या मालकिणीची गळा चिरून हत्या केल्याची धकादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी या घटनेचा खुलासा केला. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याला 7 पोळ्यांची भुक असायची, पण मालकीन त्याला 5 पोळ्या द्यायची, यामुळेच त्याने हे कृत्य केले. 


डीएसपी प्रदीप राणा यांनी सांगितले की, "आरोपी नोकर राजेश पासवानने 26 वर्षीय रोजीची हत्या केली. रोजीचे पती दीपांशु स्टोन क्रेशरचा व्यवसाय करतात. शनिवारी आरोपीला कोर्टात सादर करून त्याला पोलिस रिमांडमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांना बलात्काराच्या अँगलनेही या प्रकरणाकडे पाहत आहेत. पोस्टमॉर्टमदरम्यान याची तपासणी होण्यासाठी आरोपीचे डीएनए सँपलदेखील घेण्यात आले आहेत." 


आपल्या हिश्यातील एक पोळी कुत्र्याला द्यायची होती
चौकशीतदरम्यान राजेशने सांगितले की, 'मालक दीपांशुच्या लग्नापूर्वीच मीच त्यांच्यासाठी जेवण तयार करत होतो. तेव्हा जे हवे ते खायचो. मागील वर्षी त्यांचे लग्न झाल्यापासून मालकीनने माझ्याकडून जेवण बणवणे बंद केले. त्या माझ्याकडून साफ-सफाई आणि कपडे धुण्याचे काम करून घेत असत. मला 7 ते 8 पोळी खायची सवय होती आणि माझी भुकही जास्त होती, पण मालकीन मला 5 पोळ्यांपेक्षा जास्त देत नव्हती. मी त्यांना अनेकवेळा म्हणालो होतो की, माझी भुक भागत नाही. माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे मी बिहारला गेलो होतो, परत आल्यावर मला मिळणाऱ्या 5 पोळ्यांपैकी एक पोळी दररोज घरातील कुत्र्याला द्यायला सांगितली. 


भुक लागली होती, मालकीनने नकार दिला म्हणून गळा चिरला 
तो म्हणाला, "गुरुवारी मला खूप जोराची भुक लागली होती. पण मालकीण म्हणाली-दिपांशू आल्यावरच जेवण बनेल. यामुळे मला खूप राग आला आणि किचनमधला चाकू घेऊन मी तिचा गळा चिरला. मालकीनने स्वतःचा बचाव करण्यासाठी माझ्या हाताचा चावा घेतला. पण मी अंदाजे 5 मिनीटे गळ्यावर चाकू चालवत राहीलो." 

 

"हत्येनंतर चाकूला किचनमध्ये धुऊन लपवले. नंतर माझ्यारूममध्ये जाऊन रक्त लागलेले माझे कपडे धुतले. यानंतर दोन तासांनी मालकाला फोन करून मालकीण दार उघडत नसल्याचे सांगितले. मी खूप घाबरलो होतो, पण पळून गेलो असतो तर संशय माझ्यावरच आला असता म्हणून पळालो नाही."
 

बातम्या आणखी आहेत...