आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल : मान्यवरांनी उलगडले 'तंत्र उत्तम कथा आणि पटकथा लिहिण्याचे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोविंदभाई श्रॉफ साहित्य नगरी - चित्रपट हा तरुणाईसाठी सर्वात आकर्षणाचा विषय असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याच चित्रपटांच्या निर्मितीचा एक प्रमुख भाग असलेल्या पटकथेबाबत बरेच काही जाणून घेण्याची संधी तरुणाईला दिव्य मराठीच्या मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये मिळाली. तंत्र उत्तम कथा आणि पटकथा लिहिण्याचे या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी याबाबत अनुभव आणि मते मांडली. पटकथा लेखक आणि ब्लॉगर अमोल उदगीरकर आणि महेश मुंजाळे यांच्याशी या विषयावर पद्मनाभ पाठक यांनी चर्चा केली. यावेळी चित्रपट निर्मिती आणि विशेषतः कथा, पटकथा लेखन आणि त्याविषयीचे अनेक कांगोरे या मान्यवरांनी उलगडले. सूत्रसंचलन श्रीकांत सराफ यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत दिव्य मराठीचे बालाजी सूर्यवंशी, समीर गाडगीळ आणि निलेश फाटक यांनी केले. 

 

सविस्तर वृत्त उद्याच्या (शनिवार) दैनिक दिव्य मराठीच्या अंकात..

बातम्या आणखी आहेत...