आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Setback For Lieutenant Governor Kiran Bedi As Hc Clears Government Is The Real Boss

किरण बेदींना हायकोर्टाची चपराक; सरकारच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - पुद्दुचेरीच्या उप-राज्यपाल किरण बेदींना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने फटकारले आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक दैनंदिन कामात हस्तक्षेप करण्याचा बेदींना अधिकार नाही. त्यांचे काम केवळ मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी करणे आहे. खरे अधिकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला आहेत असे कोर्टाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाने किरण बेदींना पुद्दुचेरीत प्रशासकीय अधिकाराचे देण्याचे आदेश काढले होते. हायकोर्टाने गृह विभागाचा तो आदेश देखील रद्दबातल ठरवला आहे.


काँग्रेस आमदार के. लक्ष्मीनारायणन यांनी उप-राज्यपालांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. किरण बेदी आपल्या सरकारच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करत असल्याची तक्रर त्यांनी याचिकेत केली होती. त्याच याचिकेवर सुनावणी घेताना किरण बेदींना सरकारच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्या कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या फायली मागवणे किंवा त्यांना दिशानिर्देश देऊ शकत नाहीत. राज्यातील प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार केवळ राज्य सरकारकडे असतात. सरकारकडेच खरे अधिकार आहेत असे हायकोर्टाने स्पष्ट केले.


लक्ष्मीनारायणन यांनी याचिकेत सांगितल्याप्रमाणे, गृहमंत्रालयाने 2017 मध्ये एक आदेश जारी केला होता. त्यामध्ये केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरीच्या उप-राज्यपाल किरण बेदींना प्रशासकीय अधिकार दिले होते. याच अधिकारांचा वापर करून त्या सरकारच्या दैनंदिन प्रशासकीय कामात हस्तक्षेप करत होत्या. तेव्हापासूनच बेदी आणि काँग्रेस सरकारमध्ये वाद उफाळून आला. त्यामुळेच, पुद्दुचेरीत खरे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारातील दुवा असलेल्या राज्यपालांना आहेत की जनतेने लोकशाही निवडणुकीने निवडून दिलेल्या सरकारला असा संघर्ष पेटला होता. त्यावरच हायकोर्टाने पडदा टाकला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप-राज्यपाल नजीब जंग यांच्यात देखील अशाच स्वरुपाचा वाद झाला होता. त्यामध्ये सुद्धा न्यायालयाने खरे अधिकार सरकारलाच असल्याचे स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...