आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराज खून प्रकरण : 100 कोटींची जमीन हडपण्याचा होता सेवेकऱ्यांचा डाव, पलकचेही डावपेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी पलक, विनायक व शरद पंडित यांनी त्यांना पूर्णत:  जाळ्यात अडकवले होते. डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले, विनायक महाराजांना झोल प्रेस नावाचे झोपेचे औषध देत होता. डॉक्टरांनी महाराजांना तपासल्यानंतर जितका डोस लिहून दिला होता, त्यापेक्षा तिप्पट जास्त डोस विनायक त्यांना पाजत होता. या डोसमुळे महाराजांना तीन दिवस झोप लागत होती. याच काळात षड‌्यंत्र रचून आरोपींनी महाराजांच्या खोलीत काही आक्षेपार्ह फोटो व मोबाइल रेकॉर्डिंग केल्यामुळे ते तणावाखाली आले होते. 

 

पोलिसांनी दिलेल्या जबाबात महाराजांची पत्नी आयुषी व महाराजांच्या  दोन्ही बहिणींनी सांगितले, महाराजांवर दबाव टाकून पलकने त्यांची तिजोरी चावी स्वत:कडे ठेवली होती. विनायक आयुषी व महाराजांचीही भेट घडू  देत नव्हता. पलकवर घरच्यांना शंका आली तेव्हा त्यांनी तिच्यावर नोकरी सोडण्याचा दबाव आणला. पलकने नोकरी सोडली पण महाराजांची चावी तिच्याकडेच राहिली होती. या तीन आरोपींनी रचलेल्या षड‌्यंत्रात महाराज पुरते गुरफटले होते. त्यांनी निराश होऊन आत्महत्या केली. 

 

मुलगी भासवून प्रेयसीची भूमिका पार पडत होती
पोलिसांनी ६ मोबाइलचा डेटा रिकव्हर केला आहे. यात महाराज व पलक यांच्यातील अश्लील चॅटिंगसह काही संदेश असे होते की, ती गुरुजींच्या आश्रमात व बाहेर लोकांना आपण त्यांची मुलगी आहोत असे सांगत होती आणि महाराजांशी प्रेयसीच्या भूमिकेतून मोबाइलवर संपर्क व अश्लील मेसेज पाठवत होती. 
 

बातम्या आणखी आहेत...