Home | National | Delhi | seven indians including one from pune missing after new zealand attack

न्यूझीलंडः हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्यांमध्ये पुण्यातील एकासह 7 भारतीय, आताच मृत घोषित करणार नाही

वृत्तसंस्था | Update - Mar 17, 2019, 09:55 AM IST

मशीदीत 'ब्रदर' म्हणून स्वागत करणाऱ्यावरच झाडली पहिली गोळी

 • seven indians including one from pune missing after new zealand attack

  ख्राइस्टचर्च - न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये दोन मशिदींवर झालेल्या वर्णद्वेषी हल्ल्यानंतर ९ भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. त्यातील २ जणांची ओळख पटली आहे. ते हल्ल्यात जखमी झाले असून, रुग्णालयात उपचार घेत आहेत. न्यूझीलंडच्या भारतीय दूतावासातील सचिव परमजित सिंह यांनी सांगितले की, सात भारतीयांना आताच मृत घोषित केले जाणार नाही. कारण, याबाबत न्यूझीलंड सरकारने काहीच म्हटले नाही. मात्र त्यांच्याकडे सात भारतीयांच्या मृत्यूची माहिती असल्याचे दूतावासाचे म्हणणे आहे. त्यातील १ महिला केरळ, २ जण हैदराबाद, १ पुणे आणि १ जण गुजरातचा आहे. इतर दोघे न्यूझीलंडमध्येच स्थायिक आहेत. कुटुंबासमक्ष ओळख पटवल्याशिवाय मृतांची नावे जाहीर करणार नाही, अशी न्यूझीलंड सरकारची भूमिका आहे.


  मशीदीत 'ब्रदर' म्हणून स्वागत करणाऱ्यावरच झाडली पहिली गोळी
  हल्लेखोर ब्रेंटन टॅरंट फेसबुक लाइव्ह करून रायफलीसह मशिदीत पोहोचला तेव्हा सर्वात आधी प्रवेशद्वारावर एक व्यक्तीशी त्याची गाठ पडली. त्या व्यक्तीने हल्लेखोराच्या स्वागतात शब्द उच्चारले, हॅलो ब्रदर. हल्लेखोर रायफल घेऊन त्याच्याच दिशेने वेगाने येत आहे, हेही त्याला माहीत होते. त्याने हॅलो ब्रदर शब्द उच्चारताच हल्लेखोराने गोळी मारली.ही घटना हल्लेखोराच्या फेसबुक लाइव्हवर स्पष्टपणे दिसते.


  मुलांची ढाल बनून उभा होता पिता; गोळी लागली, आता धोक्याबाहेर
  मशिदीतील गोळीबारादरम्यान ५२ वर्षीय अदीब सामी यांना आपल्या दोन मुलांचा वाचवण्यासाठी हल्लेखोराच्या गोळ्या स्वत:च्या अंगावर घेतल्या. हल्लेखोराने त्यांना थेट गोळी घातली. त्यात ते जखमी झाले. सुदैवाने आता धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्या शरीरातून गोळ्या काढल्या आहेत.अदीब इराकी प्रदेशातील रहिवासी असून दुबईशी त्यांचे नाते आहे. त्यांची दोन मुले अब्दुल्ला (२९) आणि अलीला (२३) ओरखडलेही नाही. मारल्या गेलेल्या ४९ लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. फ्रान्सचेे एफिल टॉवर आणि ऑस्ट्रेलियात ओपेरा हाउसमध्ये वीज बंद राहिली.न्यूझीलंडच्या अल-नूर मशिदीत प्रत्येक धर्माचे लोक एकवटले होते.

Trending